आशिया चषक २०२२ ची माहिती :- Asia Cup 2022 Information In Marathi:-

आशिया चषक २०२२ ची माहिती :- Asia Cup 2022 Information In Marathi :- प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा खेळ आवडतो. अश्यातच क्रिकेट म्हटलं कि, प्रत्येक जण उत्साहाने बघतो, खेळतो. आपल्या भारतात क्रिकेट ला खूप जास्त पसंती दिली जाते. आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी नसला तरीही, आपल्या देशात मात्र क्रिकेट चे खूप जास्त चाहते आहेत. मग क्रिकेट मध्ये कोणतीही स्पर्धा असो, प्रत्येकजण हा खेळ, हि स्पर्धा आवडीने बघतोच. अश्यातच आता आशिया चषक झालेला आहे.

आशिया चषक २०२२ ची माहिती:- Asia Cup 2022 Information In Marathi:-

आशिया चषक २०२२ ची माहिती :- Asia Cup 2022 Information In Marathi:-

यात मात्र भारताला जेतेपद पटकावता आलं नसलं तरीही या खेळाबद्दल प्रत्येक भारतीयाने तेवढीच आवड दाखविली आहे. आशिया चषक २०२२ हि आशिया चषक या स्पर्धेची १५ वि आवृत्ती आहे. याचे सामने UAE मध्ये खेळवले गेले. हि स्पर्धा खरं तर सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती. परंतु कोविड-१९ या महामारीमुळे हि स्पर्धा जुलै २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आली.

त्यानंतर जून २०२१ मध्ये श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा हि स्पर्धा घेण्याचे ठरवले होते, परंतु कोविड- १९ महामारीमुळे हे हि शक्य झाले नाही. आणि त्यांनतर २०२२ च्या यजमान पदाचे अधिकार राखून ठेवल्यानंतर पाकिस्तानने या स्पर्धेचे आयोजन केले. आणि त्यांनतर,आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ने ऑक्टोबर 2021 मध्ये, घोषणा केली की श्रीलंका 2022 स्पर्धेचे आयोजन करेल आणि पाकिस्तान 2023 च्या आवृत्तीचे आयोजन करेल.

परंतु श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बघता श्रीलंके ने आशियाई क्रिकेट परिषदेला आशिया चषक आयोजित करण्यास असमर्थता दर्शविली. आणि त्यांनतर ACC ने आशिया चषक हा UAE मध्ये घेण्याचा निर्णय घेतला. आणि २७ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या काळात आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले.आशिया चषक २०२२ या स्पर्धेने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे खूप छान मनोरंजन केलेले आहे.

आशिया कप २०२२ चे स्वरूप:- Asia Cup 2022 Format:-

आशिया चषक २०२२ चे आयोजन हे UAE मधील दोन ठिकाणी करण्यात आले. एक म्हणजे- दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि दुसरे म्हणजे- शारजाह क्रिकेट स्टेडियम. आशिया चषक २०२२ चे सामने हे T२० फॉरमॅट मध्ये खेळवले जातील. आणि आशिया चषक २०२२ मध्ये एकूण सहा देशाच्या संघाने भाग घेतला होता. आणि हे सहा संघ दोन गटात विभागले गेले.

आणि हे दोन्ही संघ एकमेकांशी एकदा खेळले आणि त्यांनतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ हे सुपर ४ मध्ये पात्र होतील आणि सुपर ४ मधील संघ हे पुन्हा एकमेकांशी खेळतील. आणि त्यांनतर सुपर ४ मधील दोन संघ हे अंतिम फेरीत दाखल होतील. आणि आशिया चषक २०२२ या स्पर्धेमध्ये एकूण १३ सामने होतील.

आशिया चषकाचा इतिहास:- History of Asia Cup:-

आशिया चषक हि स्पर्धा १९८४ मध्ये सुरु झाली. आधी हि स्पर्धा ५० षटकाच्या स्वरूपात खेळवली जात होती. म्हणजेच २०१४ पर्यंत ५० षटकाच्या स्वरूपात खेळवली जात होती. T२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये आशिया चषक सुद्धा T२० स्वरूपात खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात भारताने आशिया चषक जिंकले होते.

आणि त्यानंतर परत २०१८ मध्ये वन डे स्वरूपात आशिया चषक खेळवण्यात आला. आणि तेव्हाही आशिया चषकात भारतानेच बाजी मारली होती. आत्तापर्यंत झालेल्या १५ पर्वात भारताने सर्वाधिक विजय मिळवला आहे, म्हणजेच भारताने ७ जेतेपद पटकावून भारत अव्वल क्रमांकावर आहे आणि त्यानंतर श्रीलंकेने ६ जेतेपद पटकावून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आणि त्यानंतर पाकिस्तान ने २ जेतेपद पटकावून पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि आत्तापर्यंतच्या आशिया चषकात भारताने ६ जेतेपद हे ५० षटकाच्या स्वरूपात पटकावले आहे,आणि एक जेतेपद हे T२० स्वरूपात पटकावले आहे.

आशिया चषक २०२२ बद्दल काही गोष्टी जाणून घेऊ:- Let’s know some things about Asia Cup 2022:-

श्रीलंका संघाने आशिया चषक मध्ये २०२२ साली विजेतेपद मिळवले. आशिया चषक २०२२ मध्ये भारत,पाकिस्तान,हॉंगकॉंग,श्रीलंका,बांगलादेश,अफगाणिस्तान या सहा देशांनी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषक २०२२ जिंकला. २०२२ साली आशिया चषक मध्ये सामनावीर हा ‘किताब भानुका राजपक्षे ने मिळवला.

त्या सामन्यात त्याने ४५ चेंडूंमध्ये ७१ धाव केल्या आणि वनिंदू हसरंगा याला मालिकावीर चा पुरस्कार मिळाला. आशिया चषक २०२२ मध्ये सर्वाधिक धावा पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवान ने काढल्या. त्याने २८१ धावा काढल्या. त्यांनतर सर्वाधिक स्कोर हा विराट कोहलीने केला. त्यात त्याने १२२ धावा काढल्या. २०२२ च्या आशिया चषक मध्ये सर्वाधिक विकेट्स या भुवनेश्वर कुमारने घेतल्या.

आणि तेव्हा त्याने एकूण ११ विकेट्स घेतल्या. २०२२ च्या आशिया चषक मध्ये सर्वाधिक ११ षटकार हे रहमानुल्लाह गुरबाझ ने मारले. आणि सर्वाधिक २१ चौकार हे मोहम्मद रिझवान ने मारले होते. आशिया चषक २०२२ मध्ये भारताला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. २०२२ च्या आशिया चषकाच्या सुपर फोर मध्ये श्रीलंका,पाकिस्तान,भारत,अफगाणिस्तान या देशांनी आपले स्थान पक्के केले.

भारताने सुपर फोर मध्ये आपले स्थान पक्के करून सुद्धा भारताला अंतिम फेरी पर्यंत मजल मारता आली नाही. अश्याप्रकारे २०२२ चा आशिया चषक हा खूप रोमांचकारी आणि मनोरंजनात्मक पणे पार पडला.

आशिया चषक विजेत्यांची यादी:- Asia cup Winners List:-

आशिया चषक मध्ये केवळ आशिया खंडातील देशांचे संघ खेळत असते. १९८४ – २०२२ पर्यंतच्या विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

वर्ष (Years)विजेता (Winners)
१९८४ भारत
१९८६ श्रीलंका
१९८८ भारत
१९९०/९१ भारत
१९९५ भारत
१९९७ श्रीलंका
२००० पाकिस्तान
२००४ श्रीलंका
२००८ श्रीलंका
२०१० भारत
२०१२ पाकिस्तान
२०१४ श्रीलंका
२०१६ भारत
२०१८ भारत
२०२२श्रीलंका

Leave a Comment