कॉमन वेल्थ गेम्स 2022- Common Wealth Games 2022 In Marathi

Common Wealth Games 2022 In Marathi:- कॉमनवेल्थ गेम्स हि एक आंतराराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. जी दर ४ वर्षांनी आयोजित केली जाते. ब्रिटिश राजवटीत आलेल्या देशांमध्ये हे खेळ सुरु झाले. आणि आता हि ऑलिम्पिक आशियाई खेळानंतरची तिसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. कॉमन वेल्थ गेम्स ला राष्ट्रकुल स्पर्धा असे देखील म्हटले जाते.

Common Wealth Games 2022

Common Wealth Games 2022 In Marathi

पहिले राष्ट्रकुल खेळ १९३० मध्ये कॅनडाच्या हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आले होते.त्या काळी तो ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ओळखला जात होता. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ ज्याला सामान्यतः बर्मिंगहॅम २०२२ म्हणून ओळखले जाते. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ हे बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे खेळण्यात आले. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ हे २८ जुलै २०२२ रोजी सुरु झाले. आणि ८ ऑगस्ट २०२२ हा कॉमनवेल्थ गेम्स चा शेवटचा दिवस होता.

भारत राष्ट्रकुल खेळांमध्ये २१५ सदस्य किंवा खेळाडूंसह १८ व्यांदा सहभागी झाले. या बहू-क्रीडा स्पर्धेत सुमारे ७२ राष्ट्रकुल देशांतील सुमारे ५००० खेळाडू सहभागी झाले आहेत.प्रिन्स चार्ल्स उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. या खेळांमध्ये 72 हून अधिक देश आणि प्रदेशातील खेळाडू सहभागी झाले होते.कॉमनवेल्थ गेम्स किंवा राष्ट्रकुल ही एक आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये राष्ट्रकुल देशांतील खेळाडूंचा समावेश होता.

भारताने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य, आणि २३ कांस्य पदकांसह ६१ पदके जिंकत पदतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. आणि पदतालिकेत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनतर दुसरे स्थान इंग्लंड आणि तिसरे स्थान हे कॅनडा ने पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया ने ६७ सुवर्णपदकांसह १७८ पदके जिंकली.आणि इंग्लंड ने ५७ सुवर्ण पदकांसह १७६ पदके जिंकली.

आणि कॅनडा ने २६ सुवर्ण पदकांसह ९२ पदके जिकंली. भारताला कुस्तीमधून सर्वाधिक सुवर्ण आणि सर्वाधिक पदके मिळाली. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ४ सुवर्ण, १ रौप्य,आणि एक कांस्य पदक जिंकले. या आधी भारताला दिल्ली कॉमन वेल्थ गेम्स २०१० मध्ये सर्वधिक १०१ पदके जिंकली होती. आणि २००२ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या कॉमन वेल्थ गेम्स मध्ये एकूण ६९ पदक जिंकली होती.

आणि २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे एकूण ६६ पदक जिंकली होती. तसेच २०१४ मध्ये ग्लासगो येथे ६४ पदक जिंकली गेली होती. भारताला प्राचीन काळापासून महापुरुषांचा देश म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे खेळ आहेत आणि विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारताचा गौरव करणारे खेळाडू आहेत.

कॉमन वेल्थ गेम्स २०२२ विजेत्यांची यादी खालील प्रमाणे दिली आहे.-

Common Wealth Games २०२२:- Gold Medal Winner’s

मीराबाई चानू, (वेटलिफ्टिंग)
जेरेमी लालरिनुंगा, (वेटलिफ्टिंग)
अचिंत शेउली, (वेटलिफ्टिंग)
भारतीय महिला टीम, (लॉन बॉल्स)
भारतीय पुरुष टीम (टेबल टेनिस मिक्स्ड टीम)
सुधीर, (पैरा पावर लिफ्टिंग)
बजरंग पूनिया, (कुस्ती)
दीपक पूनिया, (कुस्ती)
साक्षी मलिक, (कुस्ती)
रवि दहिया (कुस्ती)
विनेश फोगाट (कुस्ती)
नवीन सिहाग (कुस्ती)
भाविना पटेल (पैरा टेबल टेनिस)
नीतू घनघस (बॉक्सिंग)
अमित पंघाल (बॉक्सिंग)
निकहत जरीन (बॉक्सिंग)
शरत कमल आणि श्रीजा अकुला (टेबल टेनिस)
एल्डोस पॉल (तिहेरी उडी, एथलेटिक्स)
पीवी सिंधु (बैडमिंटन)
लक्ष्य सेन (बैडमिंटन)
अचंता शरत कमल (टेबल टेनिस)
चिराग शेट्टी-सात्विक साईंराजरैंकीरेड्डी (बैडमिंटन)

Common Wealth Games २०२२:- Silver Medal Winner’s

संकेत सरगर, (वेटलिफ्टिंग)
बिंदियारानी देवी, (वेटलिफ्टिंग)
सुशीला देवी, (जूडो)
विकास ठाकुर, (वेटलिफ्टिंग)
भारतीय बैडमिंटन टीम, (बैडमिंटन मिक्स्ड टीम)
तुलिका मान, (जूडो)
मुरली श्रीशंकर, (लांब उडी, एथलेटिक्स)
अंशू मलिक, (कुस्ती)
अविनाश साबले (३००० मीटर स्टीपलचेज, एथलेटिक्स)
प्रियंका गोस्वामी (१००० मीटर चालण्याची शर्यत, एथलेटिक्स)
पुरुष टीम (लॉन बॉल्स)
सागर अहलावत (बॉक्सिंग)
शरत कमल आणि जी साथियान (टेबल टेनिस)
महिला क्रिकेट टीम
अब्दुल्लाह अबूबकर (तिहेरी उडी, एथलेटिक्स)
भारतीय पुरुष हॉकी टीम

Common Wealth Games २०२२:- Bronze Medal Winner’s

गुरुराज पुजारी, (वेटलिफ्टिंग)
विजय कुमार यादव, (जूडो)
हरजिंदर कौर, (वेटलिफ्टिंग)
लवप्रीत सिंह, (वेटलिफ्टिंग)
सौरव घोषाल, (स्क्वैश)
गुरदीप सिंह, (वेटलिफ्टिंग)
तेजस्विन शंकर, एथलेटिक्स (पुरुष उंच उडी)
दिव्या काकरान, (कुस्ती)
मोहित ग्रेवाल, (कुस्ती)
जैसमिन लंबोरिया, (बॉक्सिंग)
पूजा गहलोत (कुस्ती)
पूजा सिहाग (कुस्ती)
मोहम्मद हसमुद्दीन (बॉक्सिंग)
दीपक नेहरा (कुस्ती)
सोनलबेन पटेल (पैरा टेबल टेनिस)
रोहित टोकस (बॉक्सिंग)
महिला हॉकी टीम
संदीप कुमार (१०००० मीटर चालण्याची शर्यत, एथलेटिक्स)
अनु रानी (भाला फेंक, एथलेटिक्स)
किदांबी श्रीकांत (बैडमिंटन)
त्रिसा जॉली व गायत्री गोपीचंद (बैडमिंटन)
दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषाल (स्क्वाश)
जी. साथियान (टेबल टेनिस)

Leave a Comment