आइस हॉकी ची मराठीमध्ये संपूर्ण माहिती:- Ice Hockey Complete Information in Marathi:-

आइस हॉकी ची मराठीमध्ये संपूर्ण माहिती:- Ice Hockey Complete Information in Marathi:- आइस हॉकी हा एक हॉकीचाच प्रकार आहे. हॉकीविषयी अपल्याला थोडीफार माहिती आहेच, तर आज आपण आइस हॉकी बद्दल माहिती जाणून घेऊ.

आइस हॉकी ची मराठीमध्ये संपूर्ण माहिती:- Ice Hockey Complete Information in Marathi:-

Complete Information of Ice Hockey
आइस हॉकी ची मराठीमध्ये संपूर्ण माहिती

आइस हॉकी हा हॉकीसारखाच खेळल्या जातो, आइस हॉकी फक्त बर्फावर खेळल्या जातो. आइस हॉकी हा एक सांघिक खेळ आहे. आइस हॉकी हा अतिशय प्रसिद्ध असा खेळ आहे. आइस हॉकी हा हिवाळी ऑलिम्पिक खेळ आहे.

आइस हॉकी हा आइस स्केट्सच्या साहाय्याने खेळला जाणारा खेळ आहे. उत्तर अमेरिका आणि युरोप मध्ये आइस हॉकी हा खेळ सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

आइस हॉकी हा खेळ ६-६ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. ६ खेळाडूंपैकी एक खेळाडू हा गोलरक्षक असतो. जो संघ सर्वात जास्त गोल करणार तो संघ विजेता होणार, असे आइस हॉकी या खेळाचे उद्दिष्ट आहे.

आइस हॉकी हा खेळ बर्फावर खेळला जातो. आइस हॉकी हा इनडोअर तसेच आऊटडोअर अश्या दोन्ही प्रकारचा खेळ आहे. आइस हॉकी या खेळाची उत्पत्ती हि कॅनडा मध्ये झाली.

आइस हॉकी हा खेळ उत्तर अमेरिकेबरोबरच फिनलँड, रुस, स्वीडन, बेलारूस, स्वित्झरलँड, स्लोव्हाकिया यांसारख्या देशांमध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. आइस हॉकी हा खेळ महिला आणि पुरुष असे दोन्ही वर्गात खेळल्या जातो.

आइस हॉकी खेळाचा इतिहास:- History of Ice Hockey:-

१८ व्या शतकात आइस हॉकी या खेळाची सुरुवात कॅनडा मध्ये झाली. प्रारंभीच्या काळात आइस हॉकी हा खेळ प्राकृतिक बर्फाच्या मैदानावर खेळल्या जात होता, परंतु आजकाल कृत्रिम बर्फाच्या मैदानावर सुद्धा खेळला जातो.

असे मानले जाते कि, १८ आणि १९ व्या शतकात आयर्लंड, स्कॉटलंड मध्ये खेळल्या गेलेल्या साध्या स्टिक आणि बॉल मधून आइस हॉकी हा खेळ विकसित झालेला आहे. सुरुवातीला आइस हॉकीचे नियम हे कॅनडा मध्येच बनले होते.

१९०८ मध्ये आंतरराष्ट्रीय आइस हॉकी महासंघाची स्थापना करण्यात आली. फ्रान्स, बेल्जीयम, ग्रेट ब्रिटन, स्वित्झरलँड यांसारख्या देशांनी आइस हॉकीच्या विस्तारात मोलाचे योगदान दिले आहेत.

आइस हॉकी ची सुरुवातीची उत्पत्ती हि बँडी होती. कॅनडा मध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश सैनिकांनी आइस हॉकी हा खेळ १८५०-१८६० च्या काळात अमेरिका खंडात आणला.

आइस हॉकी खेळायला लागणारे उपकरणे:- Equipment Required to Play Ice Hockey:-

Equipment Required to Play Ice Hockey
आइस हॉकी खेळायला लागणारे उपकरणे

आइस हॉकी खेळायला खालील उपकरणांची आवश्यकता आहे-

१) पक:- पक हे व्हल्कनाइज्ड रबरपासून बनलेले एक प्रोजेक्टाईल आहे. याचा वापर खेळाडू काठीच्या साहाय्याने गोल मारण्यासाठी करतात.

२) स्टिक:- हा कार्बन किंवा लाकडाचा सपाट हुक असलेला एक लांब, पातळ स्टिक आहे, जिचा उपयोग शूटिंग, पासिंग आणि स्टिकहँडलिंगसाठी केला जातो. स्टिकचा आकार वापरणाऱ्या खेळाडूची उंची आणि वजन यावर अवलंबून असते.

३) हॉकी स्केट्स:- हॉकी स्केट्स हे विशेष आइस स्केट्स आहेत जे हॉकीपटूंनी बर्फ ओलांडून धावण्यासाठी आणि त्यांच्या पायांचे दुखापतीपासून संरक्षण करण्यासाठी वापरलेजातात.

४) हेल्मेट:- हेल्मेट सर्व खेळाडूंसाठी आवश्यक आहे. डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत होऊ नये, यासाठी हेल्मेट वापरले जातात.

५) हातमोजे:- हातमोजे हे चामड्यापासून बनवलेले असतात. खेळाडूंच्या हाताचे आणि बोटाचे संरक्षण करण्यासाठी वापरले जातात.

६) माउथ गार्ड:- दात आणि जबड्याच्या रक्षणार्थ माऊथ गार्ड वापरले जातात.

७) शिन पॅड्स:- स्केट्स, काठ्या, पक्स आणि इतर दुखापतींपासून वाचण्यासाठी शिंपडस चा वापर करतात. खेळाडूंची उंची आणि पायाच्या मापनांनुसार वेगवगेळ्या आकारात शिन पॅड्स हे उपलब्ध आहेत.

आइस हॉकी चे नियम:- Rules of Ice Hockey:-

आइस हॉकी या खेळाचे काही सामान्य नियम खालीलप्रमाणे आहेत-

  • आइस हॉकी या खेळात ६-६ खेळाडूंचे दोन संघ भाग घेतात.
  • खेळाचा अवधी हा २० मिनिटे असतो आणि अश्या प्रकारचे ३ सामने होतात.
  • प्रत्येक सामन्यात १० मिनिटांचा ब्रेक असतो.
  • जो संघ सर्वात जास्त गोल करणार त्या संघाला विजयी घोषित केल्या जाते.
  • अखेरीस, तीनही फेऱ्यांनंतरही विजय घोषित झाला नाही, तर शेवटच्या टप्प्यात १५ मिनिटांचे अंतर देऊन परत खेळ करतात, “सडन डेथ” म्हणजे आणखी १० मिनिटांचा डाव खेळला जातो. यामध्ये जो संघ गोल करतो त्याला विजयी म्हणतात.
  • पेनल्टी जर विरोधी संघाच्या कोणत्याही खेळाडूला धक्का दिला, खाली टाकला किंवा कोपर मारला गेला तर तो फाऊल मानला जातो.

आइस हॉकीचे मैदान किंवा रिंक:- Ice Hockey Grounds or Rinks:-

आइस हॉकीच्या मैदानाला आइस हॉकी रिंक असे सुद्धा म्हणतात. आइस हॉकीचे रिंक हे कृत्रिमरीत्या बनवलेले असतात. आइस हॉकीचे मैदान ने आयताकार असते. फुटबॉलच्या मैदानासारखे असते, ज्यात दोन्ही बाजूंनी गोलपोस्ट असते.

मैदानाची लांबी हि ८५ फूट आणि रुंदी २० फूट असते. गोलपोस्ट ची रुंदी ६ फूट आणि उंची ४ फूट असते. रिंकच्या दोन्ही बाजूला साइड बोर्ड असतात.

Leave a Comment