सायकल पोलो खेळाविषयी माहिती:- Cycle Polo Sport Information In Marathi:-

सायकल पोलो खेळाविषयी माहिती:- Cycle Polo Sport Information In Marathi:- पोलो या खेळाचे जगभरात अनेक प्रकार आहेत, आज आपण सायकल पोलो या खेळाविषयी जाणून घेणार आहोत. सायकल पोलो हा एक सांघिक खेळ आहे.

सायकल पोलो खेळाविषयी माहिती:- Cycle Polo Sport Information:-

Cycle Polo Sport Information

सायकल पोलो हा खेळ सायकल वर बसून काठीच्या साहाय्याने खेळल्या जातो. सायकल पोलो हा पोलो या खेळासारखाच आहे. सायकल पोलो हा खेळ जगभरात जवळपास १५ देशांमध्ये खेळल्या जातो.

सायकल पोलो या खेळाच्या दोन आवृत्या आहेत, एक म्हणजे पारंपरिक गवताचा खेळ आणि दुसरी म्हणजे हार्डकोर्ट बाइक पोलो. हार्डकोर्ट आवृत्तीला हार्डकोर्ट बाइक पोलो किंवा अर्बन बाइक पोलो असे देखील म्हणतात.

सध्याच्या काळात हार्डकोर्ट आवृत्ती हि खूप प्रमाणात लोकप्रिय होत आहे. सायकल पोलो हा खेळ महिला आणि पुरुष असे दोन्ही वर्ग खेळू शकतात. सायकल पोलो हा खेळ सायकल चालवत खेळावा लागतो.

सायकल पोलो या खेळामुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो. शरीराचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. सायकल पोलो हा खेळ अनेक देशांमध्ये खेळल्या जातो.

सायकल पोलो हा खेळ आयर्लंड, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, फ्रान्स, भारत, जर्मनी, पाकिस्तान, इंग्लंड, स्कॉटलंड, न्यूझीलंड, अर्जेन्टिना, हंगेरी, पोलंड, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये सायकल पोलो हा खेळ खेळल्या जातो. सायकल पोलो हा खेळ अतिशय मजेशीर असा खेळ आहे.

सायकल पोलो या खेळाचा इतिहास:- History of Cycle Polo:-

 History of Cycle Polo

सायकल पोलो या खेळाचा शोध आयर्लंड या देशात लागला. आयर्लंड मधील काऊंटी विकलो येथे १८९१ मध्ये निवृत्त सायकलपटू रिचर्ड जे. मेक्रॅडी यांनी लावला होता.

पारंपरिक सायकल पोलो हा खेळ गवताच्या मैदानावर खेळला जात होता, परंतु आता सायकल पोलो हा खेळ लहान कोर्टवर सुद्धा खेळल्या जात आहे. सायकल पोलो हा खेळ आता लोकप्रिय होताना दिसत आहे.

१९०८ पर्यंत सायकल पोलो हा खेळ खूप लोकप्रिय झाला आणि १९०८ च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये सायकल पोलो हा खेळ एक प्रात्यक्षिक खेळ म्हणून खेळल्या गेल्या होता. त्यावेळेस इंग्लडच्या संघाने जर्मनीचा पराभव करत ३-१ ने सुवर्णपदक जिंकले होते.

१९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हापासून सायकल पोलो या खेळात मोठा अडथळा निर्माण झाला आणि सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. १९३० च्या दशकास सायकल पोलो असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन ने नियमांमध्ये सुधारणा केल्या.

१९४० च्या सुमारास सायकल पोलो हा खेळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि लोकप्रिय झाला. सायकल पोलो हा खेळ आता १५ पेक्षा अधिक देशांमध्ये खेळू लागला.

सायकल पोलो हा खेळ कसा खेळतात? How to Play Cycle Polo?

सायकल पोलो हा खेळ दोन संघामध्ये खेळल्या जातो. सायकल पोलो हा खेळ आयताकृती गवताच्या मैदानावर खेळल्या जातो. या मैदान हे सुमारे १५० मीटर बाय १०० मीटर असायला हवे.

सायकल पोलो हा खेळ सुमारे ३० मिनिटे चालतो, आणि हे ३० मिनिटे, ७.५ मिनिटाच्या कालावधीत विभागली जातात. सायकल पोलो या खेळात २४ सेमी व्यासाच्या चेंडूचा वापर करावा.

सायकल पोलोमध्ये खेळाडूंचे पाय जमिनीला स्पर्श करू शकत नाहीत, त्यांना संपूर्ण सायकल चालवायची असते. पुढे, एक खेळाडू जास्तीत जास्त ३ सतत टॅप करू शकतो, ज्यानंतर खेळाडूला चेंडू सोडावा लागतो किंवा सहकारी संघातील सहकारी हातात घेतो आणि खेळणे सुरू ठेवतो.

हार्डकोर्ट खेळात प्रत्येक संघात ३ खेळाडू असतात. हार्डकोर्ट खेळात स्ट्रीट हॉकी चेंडू वापरल्या जातो. हा खेळ साधारणतः १० मिनिटे चालतो.

सायकल पोलो या खेळाचे नियम:- Rules of Cycle Polo:-

सायकल पोलो या खेळाचे नियम खालीलप्रमाणे बघुयात-

  • सायकल पोलो हा खेळ दोन खेळायला दोन संघ आवश्यक आहे.
  • प्रत्येकी खेळात ४ खेळाडू आणि ४ अतिरिक्त खेळाडू असणे आवश्यक आहे.
  • पुरुषांसाठी सायकल पोलो या खेळाचे मैदान हे १५० मीटर लांब आणि १०० मीटर रुंद असायला हवे.
  • महिलांसाठी खेळाचे मैदान हे १२० मीटर लांब आणि ८० मीटर रुंद असले पाहिजे.
  • गोलपोस्ट हे ४ मीटर अंतरावर असून त्याची उंची २.५ मीटर आणि रुंदी १.५ मीटर असते.
  • कोणत्याही मेक आणि साइजचे सामान्य सायकल वापरले जाऊ शकते.
  • मड गार्ड, घंटा, स्टँड, वाहक किंवा गीअर्स यासारख्या कोणत्याही अतिरिक्त संलग्नकांना परवानगी नाही.
  • चेंडूचे वजन हे ८५ ते ९० ग्रॅम असायला हवे. चेंडूचा व्यास हा २४ सेमी असायला हवा.
  • ३६,३४ आणि ३२ इंच आकाराच्या लाकडी डोके असलेल्या बांबूच्या छडीपासून बनवलेल्या काठ्या खेळासाठी वापरल्या जातात.
  • सायकल पोलो मध्ये खेळाडू जमिनीला स्पर्श करू शकत नाही.

Leave a Comment