बॉक्सिंग या खेळाबद्दल माहिती:- Information about Boxing In Marathi:-

बॉक्सिंग या खेळाबद्दल माहिती:- Information about Boxing In Marathi:- बॉक्सिंग हा खेळ एक आक्रमक खेळ म्हणून ओळखला जातो. हि एक अशी मार्शल आर्ट आहे जी मनगटाने लढली जाते. आणि बॉक्सिंग हा खेळ खूप लोकप्रिय आहे. बॉक्सिंग हा खेळ खूप प्राचीन काळापासून खेळला जात आहे.

बॉक्सिंग या खेळाबद्दल माहिती:- Information about Boxing:-

बॉक्सिंग या खेळाबद्दल माहिती:- Information about Boxing In Marathi:-
बॉक्सिंग या खेळाबद्दल माहिती

बॉक्सिंग हा खेळ रामायण, महाभारत या काळापासून खेळला जात आहे. तेव्हा याला मोष्टिक युद्ध असे म्हणायचे. आधीच्या काळात हा खेळ खूप धोकादायक होता, कारण हा खेळ म्हणजे मल्ल-युद्ध आणि कुस्ती या दोन खेळांचे मिश्रण होते. नंतर काळानुसार या खेळात बदल होत गेले. आणि आजच्या सुसंस्कृत काळात हा खेळ बॉक्सिंग म्हणून ओळखला जातो.

ऑलिम्पिक मध्ये या खेळाचे खूप महत्वाचे स्थान आहे. बॉक्सिंग हा खेळ खूप रोमांचकारी आहे. आणि हा खेळ खेळायला खूप ताकदीची आवश्यकता आहे. बॉक्सिंग या खेळामुळे शरीराचा व्यायाम खूप चांगल्या प्रकारे होतो. बॉक्सिंग हा खेळ वेगवेगळ्या वयोगटानुसार खेळला जातो.

बॉक्सिंग हा खेळ भारताच्या प्रयेक कानाकोपऱ्यात खेळला जातो. जगभरात बॉक्सिंग या खेळला वेगवेगळी नावे आहे. बॉक्सिंग हा खेळ आता काळानुसार खूप विकसित झाला आहे. बॉक्सिंग या खेळात दोन खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात. या खेळात खेळाडू एकमेकांशी त्यांची इच्छा शक्ती, ताकद, चपळाई, सहनशक्ती आणि वेग पाहून एकमेकांशी लढतात.

बॉक्सिंग हा खेळ एक चौरस मैदानावर खेळतात. त्याला बॉक्सिंग रिंग असे म्हणतात. बॉक्सिंग हा खेळ काही नियमांना गृहीत धरून खेळला जातो. बॉक्सिंग या खेळात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. बॉक्सिंग हा खेळ जगभरात प्रसिद्ध आहे.

मॅरी कॉम हि भारताची बॉक्सिंग खेळाडू आहे जी सहा वेळा विश्व चॅम्पियन राहिली आहे. ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंगला हौशी बॉक्सिंग म्हणतात.

बॉक्सिंग चा इतिहास:- History of Boxing:-

बॉक्सिंग हा एक प्राचीन खेळ आहे. जो रामायण महाभारत या काळापासून खेळला जात आहे. आधुनिक बॉक्सिंग ची सुरुवात हि १७१९ मध्ये इंग्लंड येथे झाली. त्यावेळी हा खेळ हातमोजे शिवाय खेळला जायचं परंतु काळानुसार यात बदल होत गेले. आणि हा खेळ धोकादायक खेळातून एका सभ्य खेळात सामील झाला.

प्रथमतः या जॅक ब्रॉटन यांनी या खेळाचे नियम १७४३ मध्ये बनवले. ब्रॉटनच्या नियमांनुसार, बॉक्सिंग सामन्यात प्रतिस्पर्धी खाली पडल्यास, त्याला मागे उभे राहण्यासाठी पूर्ण ३० सेकंद असतील.

ब्रॉटन यांच्या नियमांच्या आधारवर १८३७ मध्ये हे नियम परत नव्याने बदलवण्यात आले हे बॉक्सिंगचे नियम व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये अजूनही पाळले जातात. ज्यामध्ये लाथ मारणे, चावा घेणे, बटिंग गॉगिंग, स्क्रॅचिंग, पडलेल्या खेळाडूवर हल्ला करणे आणि दोरी पकडणे यासारख्या कृतींवर बंदी घालण्यात आली आहे.

ब्रॉटन यांच्या नियमांना लक्षात घेऊन नंतर या खेळात पॅड ग्लोव्हज, शूज, ३-३ मिनिटांच्या फेऱ्या आणि एक मिनिट विश्रांती अशी तरतूद करण्यात आली. ऑलिम्पिक मध्ये १९०४ मध्ये प्रथमतः बॉक्सिंग ला सामील करण्यात आले. आणि यांनतर बॉक्सिंग हा ऑलिम्पिकचा एक अविभाज्य खेळ बनला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत १९५४ मध्ये बॉक्सिंग चा समावेश करण्यात आला. १९४९ मध्ये भारतीय बॉक्सिंग फेडरेशन ची स्थापना करण्यात आली. यामुळेच १९५० मध्ये पहिल्यांदा भारतीय बॉक्सिंग ची राष्ट्रीय स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात आली. २० व्या शतकात बॉक्सिंग ला रेडिओद्वारे प्रचारित आणि प्रसारित करण्यात आले. आणि रेडिओमुळे बॉक्सिंग हा खेळ खूप लोकप्रिय झाला.

बॉक्सिंग चे नियम:- Rules of Boxing:-

  • बॉक्सिंगमध्ये, दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना फक्त त्यांच्या पंचांनी एकमेकांना मारावे लागते. बॉक्सिंगमध्ये चार प्रकारचे पंच असतात: जब, क्रॉस, हुक आणि अपरकट.
  • बॉक्सिंग खेळामध्ये एक निश्चित लढाई क्षेत्र असते आणि त्याला रिंग म्हणतात, ही रिंग २० फूट रुंद आणि २० फूट लांब असते.
  • बॉक्सिंगमध्ये, दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांना डोके आणि कंबरेच्या वर मारू शकतात, जो प्रतिस्पर्धी कंबरेखाली मारतो तो फाऊल होतो.
  • बॉक्सिंगमध्ये, जर प्रतिस्पर्धी खाली पडला, तर त्याला परत उभे राहण्यासाठी पूर्ण 10 सेकंद मिळतात. जर तो 10 सेकंदांच्या आत उभा असेल, तर सामना पुढे बोलावला जातो आणि जर प्रतिस्पर्ध्याला उठता येत नसेल, तर सामना तिथेच संपवला जातो आणि इतर प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित केले जाते.
  • पण जर एखाद्या सामन्यात दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांना नॉकआउट करू शकले नाहीत, तर प्रतिस्पर्ध्यापैकी एकाला स्कोअरिंगच्या आधारे विजेता घोषित केले जाते. हे स्कोअरिंग आजूबाजूला बसलेले व्यावसायिक बॉक्सिंग पंच करतात. आणि सर्वानुमते निर्णयाद्वारे विजेता निवडला जातो.
  • जर बॉक्सिंग सामन्यादरम्यान पंचांमुळे सामना थांबवला गेला किंवा कोणताही विरोधक सामना पुढे लढण्याच्या स्थितीत नसेल आणि तरीही सामना थांबविला गेला तर त्याला तांत्रिक नॉकआउट म्हणतात.
  • सामन्यादरम्यान, पंचामुळे प्रतिस्पर्धी खाली पडला तर त्याला नॉक डाउन म्हणतात.
  • जर एखाद्या प्रतिस्पर्ध्याला सामन्याच्या कोणत्याही एका फेरीत तीन किंवा त्याहून अधिक वेळा बाद केले, तर दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याला बाद फेरीने विजयी घोषित केले जाते.
  • बॉक्सिंग हा लढाईचा खेळ असला तरी त्यातही अनेक नियम आणि फाऊल आहेत, जर एखाद्या प्रतिस्पर्ध्याला सामन्यादरम्यान कोणताही नियम मोडला तर त्याला फाऊल दिला जातो किंवा त्याच्या स्कोअरिंगमधून गुण वजा केले जातात.
  • जर एखाद्या प्रतिस्पर्ध्याला एका सामन्यात खूप जास्त फाऊल केले गेले तर तो बॉक्सर अपात्र ठरवला जातो आणि इतर प्रतिस्पर्ध्याला अपात्रतेने विजयी घोषित केले जाते.
  • बॉक्सिंगमध्ये लाथ मारणे, चावणे, बट करणे, गोगिंग करणे, स्क्रॅच करणे, दोरी पकडणे आणि प्रतिस्पर्ध्याला पाडणे याला परवानगी नाही.

काही भारतीय बॉक्सर्स:- Some Indian Boxers:-

  • मोहम्मद अली कमर:- २००२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय होता.१९९१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आंतर-जिल्हा चॅम्पियन जिंकल्यावर तो प्रकाशात आला.
  • शिव थापा:- या २५ वर्षीय तरुणाने २०१५ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, युवा ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. २०१० मध्ये, आणि २०१५ वर्ल्ड्समध्ये कांस्यपदक देखील जिंकले.
  • डिंग्को सिंह:- डिंग्को सिंहने बँकॉकमध्ये १९९७ मध्ये किंग्स कप जिंकला होता. डिंग्कोने १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वर्षी भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आणि त्यांना घर तसेच भारतीय नौदलात नोकरी दिली.
  • विजेंदर सिंह:- विजेंदर सिंहने भारताला पहिले ऑलिम्पिक बॉक्सिंग पदक जिंकून दिले. आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक (कांस्य) जिंकणारा भारतातील पहिला खेळाडू ठरला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त सध्या WBO एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि WBO ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन आहेत.
  • मॅरी कॉम:- मेरी कोम हि सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकी पदक जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.दक्षिण कोरियातील इंचॉन येथे 2014 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम ही पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे.

Leave a Comment