बॅडमिंटन या खेळाबद्दल माहिती:- Information about the Game of Badminton In Marathi:-

बॅडमिंटन या खेळाबद्दल माहिती:- Information about the Game of Badminton In Marathi:- बॅडमिंटन हा खेळ संपूर्ण जगभरात खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ अतिशय रोमांचकारी आणि मनोरंजनात्मक असा खेळ आहे. बॅडमिंटन या खेळ गल्लीपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळला जातो. भारतात हा खेळ खूप लोकप्रिय आहे.

बॅडमिंटन या खेळाबद्दल माहिती:- Information about the Game of Badminton:-

बॅडमिंटन या खेळाबद्दल माहिती:- Information about the Game of Badminton In Marathi:-
बॅडमिंटन या खेळाबद्दल माहिती

सायना नेहवाल, पी.व्ही सिंधू यांसारख्य खेळाडूने बॅडमिंटनमध्ये भारताचं नाव लौकिक केलं आहे. बॅडमिंटन हा खेळ इनडोअर आणि आऊटडोअर सुद्धा खेळला जातो. म्हणजेच बॅडमिंटन हा खेळ खुल्या मैदानावर देखील खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खेळला जातो.

बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने शरीराचा व्यायाम खूप चांगल्याप्रकारे होतो. बॅडमिंटन हा खेळ खेळायला चपळाई असायला हवी. बॅडमिंटन हा खेळ टेनिस या खेळासारखाच आहे. म्हणजे या दोन खेळांमध्ये बरेच साम्य आढळून येतात. बॅडमिंटन हा खेळ ऑलिम्पिक मध्ये सुद्धा खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो. आणि दोन खेळाडूंच्या दोन संघामध्ये सुद्धा खेळला जातो.

बॅडमिंटन हा खेळ रॅकेट ने खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ एका आयताकार मैदानावर खेळला जातो. त्यालाच बॅडमिंटन कोर्ट असे देखील म्हणतात. या कोर्ट ला नेट ने विभाजित केले जाते. आणि खेळाडू एकमेकांच्या विरोधात विरुद्ध दिशेने शटलकॉक रॅकेटने एकमेकांच्या विरोधात मारत असतात.

शटल हि कृत्रिम किंवा नैसर्गिक घटकांपासून बनलेली असते. आणि यामध्ये तळाशी कोंबडीची १६ पिसे जोडलेली असते. सर्व पंखाची लांबी समान असते. आणि या पिसांमुळे शटलकॉक हवेत उडायला मदत होते.

बॅडमिंटन या खेळाचा इतिहास:- History of Badminton:-

बॅडमिंटन हा खेळ जास्त प्राचीन नाही. बॅडमिंटन हा खेळ ब्रिटिश काळापासुन खेळायला सुरुवात झाली.

१८७३ मध्ये ब्लुफोर्ट च्या ड्यूक ने इंग्लंड मध्ये बॅडमिंटन या खेळाची सुरुवात केली. म्हणूनच त्यांना बॅडमिंटनचे “जनक” असे म्हणतात. आणि या खेळाला हे नाव त्यांच्या निवास स्थानावरून पडले आहे. म्हणजेच त्यांच्या निवासस्थानाचं नाव हे “बॅडमिंटन” असे होते. बॅडमिंटन हा खेळ भारतात ब्रिटिशांनी आणला.

१८७३ च्या काळात ब्रिटिश अधिकारी बॅडमिंटन सारखा खेळ खेळायचे त्याला “शटलकॉक” असे म्हणतात. या खेळात कोंबडीच्या पिसाऐवजी लोकरीपासून बनवलेला चेंडू वापरण्यात येत होता. आधी हा खेळ ४-४ लोक खेळत असायचे पण नंतर हा खेळ एकेरी आणि दुहेरी मध्ये खेळायला सुरुवात झाली.

१९३४ मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या खेळाचे नियम बनवण्यात आले. आयर्लंड, फ्रान्स,न्यूझीलंड, आणि स्कॉटलंड हे या फेडरेशन चे संस्थापक सदस्य होते. आणि त्यांनतर १९३६ मध्ये ब्रिटिश भारत देखील फेडरेशन ऑफ बॅडमिंटन स्पोर्ट्सचा सदस्य झाला.आशिया आणि युरोप मध्ये हा खेळ खूप लोकप्रिय आहे.

भारत,चीन, इंडोनेशिया,मलेशिया आणि दक्षिण कोरिया हे बॅडमिंटनचे प्रमुख देश आहे. आणि भारताने ऑलिम्पिक पदक देखील जिंकले आहे. आणि बॅडमिंटन मध्ये जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. १८९९ मध्ये बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली.

बॅडमिंटन या खेळाचे नियम:- Rules of Badminton:-

  • बॅडमिंटन या खेळात सर्वप्रथम नाणेफेक केली जाते. आणि नाणेफेक जिंकणारा ठरवतो कि, प्रथम सर्व्ह करावे कि नाही आणि कोणत्या बाजूने खेळावे.
  • जर खेळाडूने आपल्या रॅकेटच्या साहाय्याने शटलकॉक ला विरुद्ध खेळाडूकडे ढकलले तर त्याला सर्व्ह असे म्हणतात. जेव्हा एखादा खेळाडू शटलकॉक ला मारण्यात अपयशी ठरतो, तेव्हा प्रतिस्पर्ध्याला एक गुण मिळतो.
  • जर एखादा खेळाडू रॅली गमावला तर प्रतिस्पर्ध्याला सर्व्ह करण्याची संधी मिळते. रॅली गमावण्याचे कारण हा दोष आहे.
  • खेळाडू हा उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यातून सर्व्ह करू शकतो. गेम्स मध्ये खेळाडू हा एकमेकांच्या तिरपे उभे असतात.
  • हा खेळ खेळताना दोनदा ब्रेक घेतल्या जातो. जो खेळाडू दोनदा गेम जिंकतो त्याला विजेता घोषित केले जाते. प्रत्येक खेळाडमध्ये खेळाडू आपली बाजू बदलवतो.
  • बॅडमिंटन हा खेळ एकूण २१ गुणांचा आहे. जो खेळाडू सर्वाधिक गुण मिळवतो त्याला विजेता घोषित केले जाते. आणि खेळ हा २९ गुणांपर्यंत खाली गेल्यास विजेत्याचा निर्णय सुवर्ण गुणांनी केला जातो.
बॅडमिंटन या खेळाबद्दल माहिती:- Information about the Game of Badminton In Marathi:-

बॅडमिंटन खेळाचे उपकरणे:- Equipment of Badminton:-

१) रॅकेट:- संघातील सर्व खेळाडूंकडे प्रत्येकी एक रॅकेट आहे ज्याच्या मदतीने ते शटलकॉकला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मारतात. शटलकॉकला गती देण्यासाठी रॅकेटचा वापर केला जातो, तो हलका धातूपासून बनलेला असतो. रॅकेटची लांबी ६८० मिमी आणि रुंदी २३० मिमी आहे, त्याचे वजन ७० ते ९५ ग्रॅम आहे.

२) शटलकॉक:- शटलकॉक बनवण्यासाठी कृत्रिम किंवा नैसर्गिक घटक वापरले जातात. शटलकॉकमध्ये १६ पिसे असतात. आणि ते पिसे सामान लांबीचे असतात. त्याचे वजन ४.७४ ग्रॅम ते ५.५० ग्रॅम दरम्यान असते.

३) शुज:- हा खेळ खेळण्यासाठी शूज खूप महत्वाचे आहेत कारण जेव्हा आपण शटलकॉक मारण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावतो तेव्हा जर आपले शुजने ग्रीप पकडली नाहीत तर आपण पडू आणि शटलकॉक मारता येणार नाही आणि आपल्या कोर्टात तो सोडू. त्यामुळेच बॅडमिंटनच्या खेळात चांगल्या दर्जाच्या शूजचा वापर केला जातो.

भारतीय बॅडमिंटन खेळाडू:- Indian Badminton Players:-

भारतात अनेक बॅडमिंटन खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या देशाला अनेक पदके जिंकून दिली आहे. आणि आपल्या देशाच नाव जगभर गाजवलं आहे. अश्याच काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

१) प्रकाश पादुकोण:- प्रकाश पदुकोण हे भारतातील बॅडमिंटनच्या इतिहासातील बहुधा पहिले सुपरस्टार आहे. प्रकाश पदुकोण हे १९८० मध्ये प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय आहेत. १९७८ मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा जिंकून बॅडमिंटनमध्ये भारताचा पहिला राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता देखील आहे.

२) पुलेला गोपीचंद:- प्रकाश पदुकोण यांच्याकडून प्रेरित होऊन, पुलेला गोपीचंद यांनी ९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे अनुसरण केले. गोपीचंदने २००१ मध्ये ऑल इंग्लंड जिंकले आणि बॅडमिंटनच्या भारतीय इतिहासात प्रवेश केला.

३) साइना नेहवाल:- सायना नेहवाल हि पुलेला गोपीचंद यांची शिष्या आहे. सायना नेहवाल ही भारताची बॅडमिंटनमधील पहिली ऑलिम्पिक पदक विजेती आहे. नेहवालने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले.

४) पी व्ही सिंधु:- पी व्ही सिंधु ने २०१६ मध्ये भारतासाठी बॅडमिंटन इतिहासातील पहिले रौप्य पदक जिंकले. २०१९ मध्ये, तीने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून पहिली भारतीय बनली आणि सध्या ती महिला जागतिक चॅम्पियन आहे.

५) किदांबी श्रीकांत:- पुलेला गोपीचंद यांच्या निवृत्तीपासून किदाम्बी श्रीकांत हा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू आहे. श्रीकांतच्या नावी सहा BWF सुपरसिरीज आणि तीन BWF ग्रँड प्रिक्स आहेत आणि त्याला २०१८ मध्ये जगातील नंबर १ पुरुष खेळाडू म्हणून स्थान मिळाले.

Leave a Comment