बास्केटबॉल या खेळाची माहिती :- Information about the Game of Basketball In Marathi:-

बास्केटबॉल या खेळाची माहिती :- Information about the Game of Basketball In Marathi:- बास्केटबॉल हा खेळ भारतापेक्षा इतर देशांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. बास्केटबॉल हा खेळ आयताकृती कोर्टवर प्रत्येकी पाच खेळाडूंच्या दोन संघात खेळला जातो. प्रतिस्पर्ध्याच्या बास्केटमधून चेंडू टाकून गोल करणे हे या खेळाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

बास्केटबॉल या खेळाची माहिती :- Information about the Game of Basketball In Marathi:-

बास्केटबॉल या खेळाची माहिती :- Information about the Game of Basketball In Marathi:-

बास्केटबॉल हा खेळ मूळ अमेरिकेचा आहे. आणि १८९१ मध्ये हा अमेरिकेमध्ये उदयास आला. म्हणूनच बास्केटबॉल अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे. बास्केटबॉल हा एक ऑलिम्पिक मधील खेळ आहे.

ऑलिम्पिक मध्ये खेळायला सुरुवात झाली तेव्हापासून या खेळाला जास्त पसंती दिली जात आहे. हा खेळ उत्तर अमेरिकेत खेळला जात असला तरीही, आता मात्र आशियाई देशांमध्ये सुद्धा खेळला जात आहे. खास करून तर चीन मध्ये हा खेळ जास्त लोकप्रिय होत आहे.

शरीराच्या व्यायामासाठी हा खेळ खूप उपयोगी आहे. तसेच बास्केटबॉल हा मनोरंजनात्मक आणि मजेशीर असा खेळ आहे. हा खेळ १० – १२ मिनिटांसाठी खेळला जातो. हा खेळ तरुणांद्वारे खेळला जातो, आणि हा खेळ खेळायला खूप ऊर्जेची गरज असते. हा खेळ बघायला आणि अनुभवायला खूप मजेशीर आहे.

बास्केटबॉल हा खेळ एका आयताकृती मैदानावर खेळला जातो,जो २८ मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असतो. बास्केटबॉल हा खेळ हिवाळ्यात आत राहून खेळता यावा म्हणून या खेळाचा शोध लावण्यात आला. हा खेळ खेळायला ताकदीसोबतच बुद्दी कौशल्याची सुद्धा गरज आहे. बास्केटबॉल हा खेळल्याने शरीर मजबूत राहते, तसेच शरीराचा व्यायाम सुद्धा होतो.

बास्केटबॉल चा इतिहास :- History of Basketball :-

बास्केटबॉल हा खेळ अमेरिकेमध्ये उदयास आला, त्यामुळे हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे. १८९१ मध्ये स्प्रिंगफिल्ड मधील वायसीएमए इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम करणारे कॅनेडियन फिजिकल ट्रेनर डॉ. जेम्स नैस्मिथ यांनी बास्केटबॉल या खेळाचा शोध लावला.

मॅसॅच्युसेट्स हिवाळ्यात आत खेळण्यासाठी म्हणून योग्य असा खेळ शोधण्याचा प्रयत्न डॉ. जेम्स नैस्मिथ करत होते.बास्केटबॉल चा पहिला सामना हा १८९२ मध्ये खेळवण्यात आला. बास्केटबॉल हे नाव डॉ. जेम्स नैस्मिथ यांच्या विद्यार्थ्याने दिले आहे आणि लगेच हा खेळ लोकप्रिय झाला . १८९५ आणि १८९६ मध्ये बास्केटबॉल हा खेळ अमेरिकेमध्ये महाविद्यालयीन स्तरावर खेळण्यात आला.

भारतामध्ये १९३० मध्ये, बास्केटबॉल हा खेळ खेळण्यास सुरुवात झाली. पुरुषांमध्ये १९३४ मध्ये दिल्ली येथे पहिली भारतीय राष्ट्रीय चॅम्पिअनशिप आयोजित केली गेली होती. १९३२ मध्ये बास्केटबॉल संघाची स्थापना झाली. आणि १९३४ मध्ये बास्केटबॉल ला ऑलिम्पिक खेळाची मान्यता मिळाली. आणि त्यांनतर १९३६ मध्ये पहिल्यांदा बर्लिन ऑलिम्पिक मध्ये बास्केटबॉल ला शामिल करण्यात आलं.

१९५० मध्ये बास्केटबॉल चा विश्वकप हा अर्जेन्टिना मध्ये सुरु झाला. आणि तसेच १९५० मध्ये बास्केटबॉल फेडेरेशन ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. आणि १९७६ मध्ये महिलांसाठी बास्केटबॉल ला ऑलिम्पिक मध्ये शामिल करण्यात आलं.

बास्केटबॉल चे नियम:- Rules of Basketball:-

  • एका संघात १२ खेळाडू असतात, पण एका वेळी जास्तीत जास्त ५ खेळाडू कोर्टवर हजर राहू शकतात. आणि खेळात त्यांना पाहिजे तितक्या वेळ बदली करू शकतात.
  • चेंडू फक्त, एकतर चेंडू उसळवून (डिब्लिंग) किंवा चेंडू पास करून हलविला जाऊ शकतो. बॉलवर दोन्ही हात ठेवल्यानंतर खेळाडूंनी बॉल टीममेट ला द्यावा किंवा गोल करण्यासाठी शूट करावा.
  • चेंडू जमिनीपासून १० फूट उंचीच्या हूपच्या आत टाकून गोल करणे, हे खेळाडूंचे उद्दिष्ट आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल कोर्ट हा २८ बाय १५ मिटर चा असतो.
  • या खेळात बॉल टॅप, रोलिंग,पासिंग किंवा खेळाडूंमध्ये धावून बास्केटमध्ये फेकले जाते.
  • खेळादरम्यान, जर खेळाडू चेंडू पास न करता दोन पायऱ्याहून अधिक पुढे गेला तर त्याला प्रवासी फाऊल दिला जातो.
  • बास्केटबॉल साठी कोर्टच्या आत राहणे अत्यंत महत्वाचे आहे जो संघ चेंडूला सीमारेषेबाहेर घेऊन जाईल तो संघ चेंडुवरील ताबा गमावतो.
  • तुमच्या हाफमध्ये बॉलचा ताबा मिळवणे म्हणजे फाऊल टाळण्यासाठी तुम्हाला हाफ वे लाइन १० सेकंदात पार करणे आवश्यक आहे.

बास्केटबॉल खेळाचे उपकरणे:- Equipment of Basketball:-

  • बास्केट (Basket) :- कोर्टच्या दोन्ही बाजूंना ३.५ फूट उंचीच्या आणि ६ फुट रुंदीच्या आयताकृती बॅकबोर्डवरून त्याच्या परिघाभॊवती आणि १८ इंच व्यासाची जाळी असलेली हूप किंवा टोपली घट्टपणे टांगलेली असते. हूप जमिनीपासून १० फूट उंचीवर टांगलेली असते.
  • चेंडू (Ball) :- बास्केटबॉल चा चेंडू हा केशरी रंगाचा गोलाकार चेंडू असतो. या चेंडूचे वजन हे ६००-६५० ग्राम चे असते. चेंडूचे मटेरियल हे रबरपासून बनलेले असते आणि ते सिन्थेटिक लेदर ने कव्हर केलेले असते.
  • शूज (Shoes) :- बास्केटबॉल चा शूज हा इतर शूजपेक्षा वेगळा असतो. म्हणजे त्याचा आकार थोडा घोट्याच्या वर जास्त जातो, त्याचा उद्देश असा कि, खेळाडूच्या घोट्याला दुखापत होऊ नये.
  • गुडघा पॅड (Knee pad) :- गुडघा पॅड हे गुडघ्याला लागणाऱ्या दुखापतीपासून संरक्षण करते. म्हणूनच खेळाडू बास्केटबॉल खेळताना गुडघा पॅड वापरतात.
  • बास्केटबॉल कोर्ट (Basketball court) :- बास्केटबॉल कोर्ट हा आयताकृती असतो. जो २८ मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असतो
  • बास्केटबॉल बोर्ड (Basketball Board) :- बास्केटबॉल बोर्ड हा ३ सेमी रुंदीच्या लाकडापासून किना ऍक्रिलिक पासून बनलेला असतो. बास्केटबॉल बोर्ड हा १८० सेमी लांब आणि १२० सेमी रुंद असतो.
  • खेळाडूंचा युनिफॉर्म (Players Uniform) :- प्रत्येक संघातील प्रत्येक संघातील खेळाडूला युनिफॉर्म परिधान करणे आवश्यक आहे. कारण खेळ सुरु असताना खेळाडूला प्रतिस्पर्धी खेळाडू ओळखता येईल.

Leave a Comment