हॉकी खेळाबद्दल माहिती Information about the game of hockey In Marathi

हॉकी खेळाबद्दल माहिती Information about the game of hockey In Marathi:- हॉकी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी हा खेळ भारतात स्वातंत्र्यपुर्व काळापासून खेळल्या जातो. हॉकी हा खेळ इंग्रजांनी आपल्या भारतात खेळायला चालू केला. हॉकी हा खूप प्रसिद्ध आणि खूप मनोरंजक खेळ आहे. आणि हॉकी हा खेळ अनेक देशांत खेळल्या जातो. हॉकी या खेळाचे विविध प्रकार जगभरात खेळले जातात. हॉकी हा प्राचीन खेळ आहे.

हॉकी खेळाबद्दल माहिती Information about the game of hockey

हॉकी खेळाबद्दल माहिती Information about the game of hockey In Marathi

जोआपल्या भारतात वर्षानुवर्षे खेळला जातो. हॉकी हा खेळ सहसा गवताचे मैदान किंवा इनडोअर स्टेडिअमवर खेळल्या जाते. हॉकी हा खेळ काठी आणि चेंडूने खेळल्या जातो. हॉकी हा खेळ भारत,पाकिस्तान,नेदरलँड्स, इंग्लंड, ब्रिटन या देशांमध्ये जास्त प्रमाणात खेळल्या जातो. हॉकीचा उगम इंग्लंड, स्कॉटलंड, आणि नेदरलँड्स या देशांमध्ये झाला आणि इतर देशांनी या खेळाला पाठिंबा दिल्याने या खेळाला प्रोत्साहन मिळाले. हॉकी हा खेळ दोन टीम मध्ये खेळल्या जातो आणि तो खुल्या मैदानावर खेळल्या जातो. आणि हॉकी हा खेळ देशातील तरुणांद्वारे खेळल्या जातो.

भारत हा खूप काळापर्यंत हॉकीमध्ये विश्व विजेता होता त्यामुळे हॉकीला भारताने राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केले. हा खेळ दोन टीम मध्ये खेळल्या जातो. आणि एका टीम मध्ये एकूण ११ खेळाडू असतात. आणि हा खेळ महिला आणि पुरुष दोन्हीहि खेळू शकतात. हॉकीच्या मैदानाचा आकार हा आयताकृती असतो. मैदानाही लांबी रुंदीपेक्षा जास्त असते.

हॉकीचा इतिहास:- History of Hockey:-

हॉकी हा खेळ खूप पुरातन काळापासुन खेळल्या जात आहे. आपल्याला निश्चितपणे कदाचित कधीच कळणार नाही. परंतु ४००० वर्षांपूर्वी या खेळात खेळलेल्या लोकांच्या नोंदी आहेत. आणि हा खेळ तेव्हा इजिप्त मध्ये खेळला गेला होता. आणि इथिओपियामध्ये १००० बीसीच्या आसपास हॉकी खेळल्या गेला होता. आणि इराण मध्ये हॉकी हा खेळ २००० बीसीच्या आसपास खेळण्यात आला होता. १८व्य शतकाच्या मध्यास हॉकीचा आधुनिक खेळ हा इंग्लंडमध्ये उदयास आला होता.

१८७६ मध्ये पहिली हॉकी असोसिएशन युके मध्ये स्थापन करण्यात आली. आणि नियमांचा पहिला औपचारिक संच तयार झाला. हि मूळ संघटना फक्त ६ वर्षे टिकली. आणि १८८६ मध्ये ९ संस्थापक क्लबद्वारे त्याचे पुनरुज्जीवन केले गेले.आणि त्यांनतर जानेवारी १८८४ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची (IHF) स्थापना झाली. हॉकीला हर्लिंग शिंटी यासारखे प्रारंभिक खेळ म्हणूनही ओळखले जाते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात हॉकी या खेळाच्या विस्ताराचे श्रेय हे ब्रिटिश सैन्याला दिले जाते.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्ध इंग्रजी शाळेमध्ये हॉकी हा खेळ खेळायला सुरुवात झाली होती. १९०८ आणि १९२० मध्ये प्रथमतः पुरुषांची फिल्ड हॉकी ऑलिम्पिक मध्ये खेळली गेली. आणि १९२८ पासून ऑलिम्पिक खेळांमध्ये हॉकी हा खेळ समाविष्ट करण्यात आला. २९ ऑक्टोबर १९०८ मध्ये लंडन ला पहिल्यांदा ऑलिम्पिक मध्ये हॉकी हा खेळ खेळल्या गेला. आणि तेव्हा त्यात फक्त सहा टीम्स ने भाग घेतला होता. आणि त्यांनतर १९२४ मध्ये काही आंतरराष्ट्रीय कारणांमुळे हॉकी हा खेळ ऑलिम्पिक मधून बाहेर करण्यात आला.

हॉकीमध्ये भारताचं प्रदर्शन हे आधीपासूनच खूप छान होत. आणि आत्तापर्यंत हॉकीने ऑलिम्पिक मध्ये आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकले आहेत. आणि त्यांनतर भारताने हॉकी मध्ये शेवटचं सुवर्ण पदक हे १९८० मध्ये जिंकलं गेलं. आणि भारतीय संघाचे नेतृत्व हे हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्याकडे असायचे. आणि मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारताने हॉकीमध्ये खूप प्रमाणात यश संपादन केले आहे. आणि मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा भारतीय क्रीडा दिवस म्ह्णून साजरा करण्यात येतो.

व्हिक्टोरियन काळात महिलांच्या खेळांवर बंदी असूनही तेव्हा महिलांमध्ये हॉकी खेळाबद्दल खूप लोकप्रियता वाढली. आणि त्यांनतर १९२७ मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ वुमेन्स हॉकी असोसिएशनची स्थापना झाली.आणि त्यांनतर १९८० मध्ये महिला हॉकी हि ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करण्यात आली.

हॉकीचे प्रकार:- Types of Hockey:-

हॉकी या खेळाचे विविध प्रकार आहेत. आणि हॉकीचे विविध प्रकार हे खालीलप्रमाणे आहेत.

१) फिल्ड हॉकी (Field Hockey):-

फिल्ड हॉकी हा खेळ गवत असलेल्या जमिनीवर किंवा कृत्रिम ग्राउंड वर खेळल्या जातो. हा खेळ जगाच्या अनेक भागांमध्ये खेळला जातो. जसे कि, युरोप, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, आशिया, दक्षिण आफ्रिका या सारख्या देशांत खेळल्या जातो. फिल्ड हॉकी हा प्रकार महिला तसेच पुरुषांमध्ये लोकप्रिय आहे.

२) आइस हॉकी ( Ice Hockey):-

आइस हॉकी हा खेळ जमिनी ऐवजी बर्फावर खेळला जातो. खेळाडू हा प्रकार खेळण्यासाठी म्हणजेच स्केटिंग करण्यासाठी आणि मुख्यतः जास्त गुण मिळवण्यासाठी स्केट्स चा वापर करतात.

३) स्लेज हॉकी (Sledge Hockey):-

स्लेज हॉकी हा आइस हॉकीचा एक प्रकार आहे. जो दिव्यांग खेळाडूंसाठी असतो. स्लेज हॉकी स्केट्स च्या साहाय्याने खेळली जाते. स्लेज हॉकीच्या विकासात कॅनडा हा आंतरराष्ट्रीय लीडर आहे. आणि खेळाची बरीच उपकरण हे आधी हे प्रथमतः तिथे विकसित केली. ज्या दिव्यांगांसाठी आइस हॉकी खेळायची आहे त्यांच्यासाठी हा स्लेज हॉकी हा प्रकार खूप फायदेशीर आहेत.

४) रोलर हॉकी (Roller Hockey):-

रोलर हॉकीचे दोन प्रकार आहे. क्वाड आणि इन-लाइन. क्वाड प्रकारातील खेळाडू गेम खेळताना क्वाड स्केट्स घालतात. हॉकीचा हा प्रकार ६० पेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जातो. इन-लाइन प्रकार खेळताना खेळाडू इन-लाइन स्केट्स वापरतात. हा खेळ १५ मिनिटाच्या अंतराने तीनदा खेळला जातो. आणि क्वाड प्रकाराच्या तुलनेत इन-लाइन हा प्रकार सोप्या पद्धतीचा आहे.

५) बँडी (Bandy):-

बँडी हा हॉकीचा रशियन आवृत्तीचा खेळ आहे. हा रशिया चा राष्ट्रीय खेळ आहे. आणि बँडी हा युरोप मध्ये खूप लोकप्रिय आहे. बँडी हा खेळ फुटबॉलच्या मैदानाच्या आकारमानाच्या जवळपास असलेल्या मैदानात खेळला जातो. बँडी चा जन्म हा आइस हॉकी पासून झाला आहेत.

६) स्ट्रीट हॉकी (Street Hockey):-

स्ट्रीट हॉकी हा प्रकार रस्त्यावर कुठेही खेळला जातो. आणि हा प्रकार कोणत्याही संरक्षक उपकरणाशिवाय रस्त्यावर खेळला जातो.

हॉकी खेळाचे नियम:- Rules of Hockey:-

  • खेळाच्या दरम्यान कोणतीही टीम तीन पेक्षा जास्त खेळाडू बदल करू शकत नाही.
  • एक वेळ बदलेला खेळाडू परत मॅच मध्ये भाग घेऊ शकत नाही.
  • जर हॉकी चा चेंडू गोलकिपर क्षेत्रात असेल तर खेळाडू चेंडूला किक मारू शकतो, किंवा आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाने चेंडू ला अडवू शकतो.
  • हॉकी स्टिक शिवाय चेंडू रोल करणे, फेकणे, टॉस करणे निषिद्ध आहे.
  • जर चेंडू एम्पायर वर आदळला तर खेळात कोणत्याही प्रकारे व्यत्यय येत नाही.
  • चेंडूला हाताने थांबवणे हे फाऊल मानले जाते.
  • हा खेळ एकूण ७० मिनिटाचा असतो ज्यात ३५-३५ मिनिटाचे दोन राऊंड खेळले जाते. आणि दोन्ही राऊंड मध्ये ५ मिनिटाचा ब्रेक असतो.
  • हॉकी या खेळात एका टीम मध्ये ११ खेळाडू असतात. ज्यातून एक कॅप्टन असतो.

हॉकीचे उपकरणं:- Equipment of Hockey:-

हॉकी स्टिक:- हॉकी स्टिक ची लांबी सामान्यतः ३६.५ ते ३७.५ इंच एवढी असते. आणि बॅटच्या शेवटी आकड्याचा आकार असतो. आणि वजन ३४० ते ७९० ग्राम एवढे असते.

चेंडू:- आधी हॉकी मध्ये वापरणारा चेंडू हा क्रिकेट मध्ये वापरणाराच आहे पण आता प्लास्टिक चेंडू सुद्धा वापरल्या जातो.

शिन गार्ड:- शिन गार्ड हे दुखापतीपासून रक्षण करण्यास वापरले जाते.

हेल्मेट:- हेल्मेट हे डोक्याच्या रक्षणासाठी आणि चेहऱ्याच्या रक्षणास वापरले जाते.

माऊथ गार्ड:- तोंडाचे आणि दातांचे रक्षण करण्यासाठी माऊथ गार्ड वापरले जाते.

शूज:- शूज हे मैदानावर मोकळेपणे धावण्यासाठी वापरले जाते.

किकर:- किकर हे गोलकिपर वापरतात. गोलरक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या बोटांचे रक्षण करण्यासाठी किकर वापरले जाते.

फेस मास्क:- फेस मास्क हे हॉकी मध्ये नवीन उपकरणामधून एक आहे. फेस मास्क मुळे पूर्ण चेहऱ्याचे रक्षण होते.

Leave a Comment