कबड्डी या खेळा संबंधी माहिती:- Information about the Game of Kabaddi In Marathi:-

कबड्डी या खेळा संबंधी माहिती:- Information about the Game of Kabaddi In Marathi:-कबड्डी हा खेळ इतर देशांपेक्षा भारतामध्ये खूप जास्त खेळला जातो. कबड्डी हा खेळ लहान मुलांपासून तर तरूणांपर्यंत खेळला जातो. कबड्डी या खेळात रग्बी, रेसलिंग, कुस्ती या सारख्या खेळांचं मिश्रण दिसुन येते.

कबड्डी या खेळा संबंधी माहिती:- Information about the Game of Kabaddi In Marathi:-

कबड्डी या खेळा संबंधी माहिती:- Information about the Game of Kabaddi In Marathi:-
कबड्डी या खेळा संबंधी माहिती

कबड्डी या खेळामध्ये ७-७ खेळाडूंचे दोन संघ असतात. कबड्डी या खेळात एकूण १२ खेळाडू असतात आणि त्यातील ५ खेळाडू हे राखीव असतात. आणि खेळ बघायला खूप जास्त मज्जा येते. आणि खेळायला पण हा खेळ खूप मनोरंजनात्मक आहे. कबड्डी या खेळामुळे शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. हा खेळ तल्लख बुद्धीसोबतच ऊर्जात्मक आहे. याआधीपेक्षा या खेळाचा खूप जास्त विकास झाला आहे.

पूर्वी हा खेळ फक्त गावांमध्ये, शालेय स्तरावर खेळला जात होता. परंतु हा खेळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळला जातो. कबड्डीचा जन्म हा मूळात भारतात झाला आहे. कबड्डी हा खेळ पुरुष आणि महिलांमध्ये खेळला जातो. कबड्डी हा खेळ भारतासोबतच शेजारच्या देशांमध्ये म्हणजेच नेपाळ,बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये देखील लोकप्रिय आहे. कबड्डी हा बांगलादेश चा राष्ट्रीय खेळ आहे.

कबड्डीला भारतामध्ये हु तू तू आणि चेडुगुडू असे सुद्धा म्हणतात. दक्षिण भारतात या खेळाला चेडुगुडू असे म्हणतात आणि पूर्व भारतात हु तू तू असे म्हणतात. भारतात कबड्डी हा खेळ मोठ्यांपासून लहानांपर्यंत मोठ्या आवडीने बघतात. या खेळात दोन संघ असतात एक संघ हा आक्रमक असतो तर दुसरा संघ हा संरक्षक असतो.

हा एक असा आहे ज्यामध्ये खेळाडूचे मुख्य काम हे आहे की विरोधी खेळाडूंच्या संघात जाऊन त्यांना स्पर्श करून आपल्या संघात यावे आणि या काळात त्याला विरोधी संघाकडे जाताना कबड्डी कबड्डी म्हणावे लागते. कबड्डी खेळाचे मैदान 12.5 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असून ते दोन भागात विभागले असते.

कबड्डी या खेळाचा इतिहास:- History of Kabaddi:-

कबड्डी हा खेळ भारतात महाभारत काळापासून खेळला जातो. कबड्डीचा जन्म हा भारतात झाला आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात कबड्डी हा खेळ खेळल्या जातो. कबड्डी या खेळाला भारतात वेगवेगळी नावे आहेत. १९३६ च्या ऑलिम्पिक मध्ये कबड्डीला जागतिक दर्जाची कीर्ती मिळाली.

१९३८ मध्ये कलकत्ता येथील राष्ट्रीय खेळांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला.अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनची १९५० मध्ये स्थापना झाली आणि कबड्डी या खेळाचे नियम निश्चित करण्यात आले. हौशी कबड्डी फेडेरेशन ऑफ इंडिया ची स्थापना १९७३ मध्ये झाली. त्याची पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नई येथे खेळवली गेली. जपानमध्येही कबड्डीला खूप प्रसिद्धी मिळाली.

१९७९ मध्ये जपानमध्ये सुंदर राम नावाच्या एका भारतीयाने जपानमध्ये कबड्डीचा प्रचार केला. १९७९ मध्ये भारतामध्ये भारत आणि बांगलादेश मध्ये कबड्डीचा सामना खेळवण्यात आला. १९८० मध्ये कबड्डी मध्ये आशिया चॅम्पिअनशिप सुरु झाली. आणि १९८० मध्ये भारताने बांगलादेशचा पराभव करून हि स्पर्धा जिंकली.

१९९० मध्ये कबड्डीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला. आता कबड्डी हा खेळ जगभरात अनेक देशांमध्ये खेळला जातो. कबड्डीचे सध्याचे स्वरूप हे १९२० मध्ये महाराष्ट्रातुन सुरु झाले, आणि तेव्हाच या खेळाचे नवीन नियम हे लागू करण्यात आले.

हरजीत बराड़ बाजखाना यांना कबड्डीचे जनक असे म्हणतात. २००४ मध्ये पहिल्यांदा कबड्डीचा विश्वकप खेळला गेला आणि त्यात भारत हा विजयी देश होता. २०१४ मध्ये भारतात कबड्डी प्रो लीग ची स्थापना करण्यात आली. आणि भारतात कबड्डी प्रो लीग ला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली.

कबड्डी या खेळा संबंधी माहिती:- Information about the Game of Kabaddi In Marathi:-

कबड्डी या खेळाचे नियम:- Rules of Kabaddi:-

  • कबड्डी या खेळात एकूण १२ खेळाडू असतात, त्यातील ७ खेळाडू हे मैदानावर असतात आणि ५ खेळाडू हे राखीव असतात.
  • सामना प्रत्येकी २० मिनिटांच्या २ कालावधीत विभागला आहे. आणि त्यामध्ये ५ मिनिटांचा ब्रेक असतो. पहिल्या २० मिनिटांनंतर खेळाडू हे त्यांचे पहिले ठिकाण बदलवतात.
  • महिलांसाठी १५-१५ मिनिटांचे दोन राऊंड असतात.
  • जेव्हा बचाव करणाऱ्या संघाचा खेळाडू हा मागच्या लाइन च्या बाहेर जातो तेव्हा तो बाद होतो.
  • रेड करणारा खेळाडू हा सतत कबड्डी कबड्डी असा म्हणतो आणि मधेच जर तो थांबला तर त्याला बाद केले जाते.
  • जर खेळादरम्यान कोणता खेळाडू हा नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल चेतावणी दिली आणि त्याने पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास समोरील संघाला एक हून दिला जातो पण त्या खेळाडूला बाद केले जात नाही.
  • रेडर जर बोनस लाइन ला पार करत असेल तर त्याला एक गुण दिला जातो.
  • कबड्डीच्या मैदानाबाहेर खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा जमिनीला स्पर्श झाला तर तो बाद होतो.
  • एकदा बदलेल्या खेळाडूला परत खेळात समाविष्ट करता येत नाही.
  • जर शेवटी दोन्ही संघांचे गुण समान असतील, तर त्या कालावधीत 5-5 अतिरिक्त रेड दिल्या जातात. जो जास्त रेड करण्यात यशस्वी होईल तो जिंकेल.
  • कबड्डीचा प्रत्येक सामना हा ४० मिनिटांचा असतो. आणि या दरम्यान खेळाडू हा विरोधी संघाच्या कोर्टात रेड करतो. आणि जो खेळाडू हल्ला करतो त्याला रेडर असे म्हणतात. एखाद्या खेळाडूने त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या संघात प्रवेश करताच एक रेड सुरू होते.

कबड्डी चे प्रकार:- Types of Kabaddi:-

कबड्डी या खेळाचे चार प्रकार आहेत. ते खाली नमूद केलेले आहेत.

१) संजीवनी कबड्डी :- या कबड्डीमध्ये खेळाडूंना पुनरुज्जीवित करण्याचा नियम आहे. जेव्हा विरोधी संघ बाद होतो, तेव्हा आक्रमक संघातून बाहेर पडलेला एक खेळाडू पुनरुज्जीवित होतो आणि पुन्हा त्याच्या संघासाठी खेळू लागतो. हा खेळ देखील 40 मिनिटांचा आहे. ज्याला खेळताना पाच मिनिटांचा ब्रेक मिळतो. दोन संघांमध्ये सात खेळाडू आहेत आणि जो संघ त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या सर्व खेळाडूंना बाद करतो त्याला बोनस म्हणून अतिरिक्त चार गुण मिळतात.

२) जेमिनी स्टाइल:- कबड्डीच्या या प्रकारांमध्ये दोन्ही संघात सात खेळाडू आहेत. आणि या प्रकारात खेळाडूंना पुनर्जीवन मिळत नाही, म्हणजे, जर एखाद्या संघाचा खेळाडू खेळादरम्यान मैदानाबाहेर गेला तर तो खेळ संपेपर्यंत बाहेर राहतो. याप्रकारे जो संघ आपल्या विरोधी संघातील सर्व खेळाडूंना बाद करून मैदानाबाहेर काढण्यात यशस्वी होतो, त्या संघाला एक गुण देण्यात येतो.

३) अमर स्टाइल:- हौशी कबड्डी फेडरेशनने आयोजित केलेला हा खेळाचा तिसरा प्रकार आहे. हा प्रकार अनेकदा संजीवनी प्रकारा सारखाचआहे, ज्यामध्ये कालावधी निश्चित केलेला नसतो. या प्रकारात खेळाडू बाद झाला तरी खेळाडूला मैदानाबाहेर जावे लागत नाही. जो खेळाडू बाद होतो तो मैदानातच राहतो आणि पुढचा खेळ खेळतो. कारण बाद होण्याच्या बदल्यात, विरोधी संघाच्या खेळाडूला एक गुण मिळतो.

४)पंजाबी कबड्डी:- हा या खेळाचा चौथा प्रकार आहे. हे वर्तुळाकार हद्दीत खेळले जाते. या वर्तुळाचा व्यास 72 फूट आहे. या कबड्डीच्या प्रकारात एकूण तीन शाखा आहे- लांबी कबड्डी, सौंची कबड्डी आणि गुंगी कबड्डी.

Leave a Comment