भालाफेक खेळाबद्दल माहिती आणि बरेच काही :- Information about the sport of javelin and much more In Marathi

भालाफेक खेळाबद्दल माहिती आणि बरेच काही :- Information about the sport of javelin and much more In Marathi:- भालाफेक हा एक ऑलिम्पिक मध्ये खेळला जाणारा खेळ आहे. भालाफेक हा मानव जातीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. भालाफेक हा ट्रॅक आणि फिल्ड ऍथलेटिक खेळ आहे ज्यामध्ये भाला जास्तीत जास्त गती आणि वेग मिळविण्यासाठी त्यांच्या आवडीच्या अंतरावरून धावून पूर्व निश्चित क्षेत्रातून फेकले जाते.

भालाफेक खेळाबद्दल माहिती आणि बरेच काही :- Information about the sport of javelin and much more:-

भालाफेक खेळाबद्दल माहिती आणि बरेच काही :- Information about the sport of javelin and much more In Marathi

पुरुषांच्या डेकॅथलॉन आणि महिला हेप्टाथलॉन मध्ये भालाफेक इव्हेंट जोडला जातो. भाल्याचा वापर हा प्राचीन काळात शिकारी आणि युद्धात केला जात होता. आणि मानव जातीच्या हळूहळू उत्क्रांतीसह, कौशल्याचे क्रीडा प्रकारात रूपांतर झाले आहे आणि आज ते जगभरातील जवळजवळ सेवा देशांद्वारे खेळले जाते.

भालाफेक हा खेळ महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी सतत सराव आणि कोण, वेग आणि अंतर तपासण्याची क्षमता आवश्यक आहे. भालाफेक हे एक ट्रॅक अँड फिल्ड खेळ आहे. जिथे भाला फेकण्यात येतो आणि तो भाला जवळपास २.५ मीटर म्हणजेच ८ फूट २ इंच लांबीचा असतो.

इतिहास:- History

प्राचीन काळात शिकार आणि युद्धात भल्याचा वापर केला जात होता. आणि त्यातूनच भालाफेक खेळ म्हणून विकसित झाले आहे. हे प्राचीन ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. इ.स. पूर्व ७०८ मध्ये पेन्टॅथलॉन भाग म्हणून ऑलिम्पिक खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. लक्ष्य थ्रो आणि अंतर हे दोन विषय आहेत ज्यामध्ये भालाफेक हा खेळ आयोजित केला जातो. १८७० च्या सुरुवातीस जर्मनी आणि स्वीडन मध्ये खांबासारखे भाला फेकले गेले. कारण तेव्हा थ्रो च्या आधी धावायची सोया नव्हती.

१८९० च्या सुमारास मर्यादित धावणे सुरु झाले. आणि आता लवकरच अमर्यादित धावणे सुरू आहे. पुरुषांसाठी १९०८ आणि महिलांसाठी १९३२ पासून हे आधुनिक ऑलिम्पिक खेळांचा एक घटक आहे. इंटरनॅशनल अससोसिएशन फॉर ऍथलेटिक फेडरेशन(IAAF) ने १९१२ मध्ये पहिला अधिकृत जागतिक विक्रम ओळखला. पुरुषांच्या भालाफेकीमध्ये १९८६ मध्ये सुधारणा करण्यात आली. आणि गुरुत्वाकर्षण केंद्र चार सेमी पुढे सरकले.


१९०९ मध्ये फिनलंड मध्ये पहिल्यांदा महिलांच्या विक्रमाची नोंद झाली. १८७० चा सुरवातीला जर्मन आणि स्वीडन मध्ये भाल्यासारखे ध्रुव लक्षात आणले गेले. स्वीडन मध्ये हे ध्रुव आधुनिक भाला म्हणून विकसित झाले. १८८० मध्ये स्वीडन आणि फिनलंड मध्ये भाला काही अंतरावर फेकण्यात आला तेव्हा ती एक सामान्य घटना बनली आणि त्यानंतर पुढील एकही वर्षात भालाफेक चे नियम विकसित होत गेले. स्वीडन चा एरिक लॅमिंग याने १८९९ मध्ये जगातील पहिली सर्वात जास्त भाला फेक केली.

आणि १९०२ ते १९१२ या काळात स्पर्धेवर राज्य केले. इंटर कॅलिटेड गेम्स मध्ये पुरुषांचा भालाफेकी ला ऑलिम्पिक शिस्त म्हणून सादर करण्यात आले त्यावेळेस लॅमिंग ने जवळपास ९ मीटर ने विजय मिळवला. आणि स्वतःचा विश्वविक्रम त्याने मोडीत काढला. तेव्हा भालाफेक हि स्पर्धा इतर कोणत्याही देशात लोकप्रिय झाली नव्हती. २०व्या शतकाचा सुरवातीला भालाफेक स्पर्धा २ हातांच्या होत्या. भाला उजव्या हाताने आणि डाव्या हाताने वेगवेगळा फेकल्या गेला आणि प्रत्येक हातासाठी सर्वोत्तम गन एकत्र जोडले गेले. १९१२ मध्ये दोन हातांची स्पर्धा फक्त एकदाच आयोजित करण्यात आली होती.

भालाफेक खेळाचे नियम:- Rules of Javelin

१) भाला फेकताना ते खांद्यावरून फेकले जाते.

२) भाल्याची लांबी २. ५ मीटर असते.

३) भाला फेकण्यापूर्वी खेळाडू ला भाल्याच्या दिशेने पाठ फिरवता येत नाही

४) भालाफेक करताना खेळाडूच्या शरीराचा कोणताही भाग मैदानावर असलेल्या रेषेला स्पर्श करत असेल तर ते खेळाचे उल्लंघन मानले जाते.

५) या खेळातील सर्वोत्तम फेक म्हणजे जा मध्ये भाल्याचा टोक जमिनीवर उभा राहतो तोच गृहीत धरल्या जातो.

६) भालाफेक करताना खेळाडूला भाला फेकण्याच्या तीन संधी दिल्या जातात जो खेळाडू सर्वात लांब भाला फेकतो तो जिंकतो.

७) भाला फेकताना भल्याचा टोक किंवा भाला तुटला तर तो प्रयत्न अयशस्वी मानला जातो.

भालाफेक खेळासाठी लागणारे उपकरणे:- Equipment for Javelin

  • शूज:- भालाफेक करताना लेदर किंवा नायलॉन शूज वापरले जातात.
  • कपडे:- भालाफेक करताना खेळाडू हलके स्लिव्हलेस किंवा शॉर्ट्स स्लीव्ह टीशर्ट्स परिधान करतात. मांड्यांना आधार देण्यासाठी शॉर्ट्स घट्ट बसवल्या जाऊ शकते.
  • भाला:- भालाफेक या खेळात भाला हलका वापरल्या जातो हा भाला तीन भागांमध्ये विभागाला आहे. ते म्हणजे टीप , शाफ्ट आणि कार्ड ग्रीप. पुरुषांसाठी भाल्याची लांबी किमान २६० सेमी म्हणजे १०२.४ इंच असून त्याचे वजन ८०० ग्राम असणे आवश्यक आहे. तसेच महिलांसाठी भाल्याची लांबी किमान २२० सेंटिमीटर म्हणजे ८६.६ इंच असून त्याचे वजन ६०० ग्राम असणे आवश्यक आहे.

जगातील सर्वोत्तम १० भालाफेकपटू:- Top 10 javelin throwers in the world

१) जोहान्स वेटर– जोहान्स वेटर हा जर्मनीचा खेळाडू आहे. आणि सध्या तो पुरुष भालाफेकीमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने ९७.७६m भाला फेकून जागतिक चॅम्पिअनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. आणि हा राष्ट्रीय विक्रम सुद्धा आहे.

२) जाकुब वडलेजच- जाकुब वडलेजच याने जागतिक चॅम्पिअनशिप मध्ये रौप्य पदक आणि ऑलिम्पिक मध्ये सुद्धा रौप्य पदक जिंकले आहे. आणि त्याने ८९.७३m भाला फेकून सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी केली आहे.

३) ज्युलियन वेबर- ज्युलियन वेबर हा एक जर्मन भालाफेकपटू आहे . त्याची वैयक्तिक ८८.२९m हि सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने दोन ऑलिम्पिक फायनल आणि वर्ल्ड चॅम्पिअनशिप फायनलमध्ये प्रवेश केला परंतु त्याला कोणत्याही पदकाला गवसणी घालता आली नाही.

४) नीरज चोप्रा- नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेकपटू आहे. आणि टोकियो येथे आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. आणि नीरज चोप्राचा वैयक्तिक सर्वोत्तम स्कोर हा ८८.०७m एवढा आहे.

५) अँड्रियन मार्डरे- अँड्रियन मार्डरे हा सर्वोत्तम भाला फेकणारा पाचवा खेळाडू आहे. तो फक्त एका ऑलिम्पिक फायनल मध्ये गेला आहे. आणि त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८६.६६m आहे.

६) अँडरसन पीटर्स- अँडरसन पीटर्स खेळाडूने जागतिक चॅम्पिअनशिप सुवर्णपदक आणि पॅन अमेरिकन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ८७.३१m आहे.

७) मार्सिन क्रुकोवस्की- मार्सिन क्रुकोवस्की हा जास्त काळ खेळत राहिला नाही त्यामुळे त्याला एकही पदक जिंकता आले नाही. परंतु त्याने दोन वर्ल्ड चॅम्पिअनशिप फायनल गाठले आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी हि ८९.५५m एवढी आहे.

८) आलियासी कटकवेट्स- आलियासी कटकवेट्स हा सर्वात तरुण भालाफेकपटू आहे. आणि बाकींच्या तुलनेत त्याला मोठ्या स्पर्धा करण्यासाठी अजून बराच वेळ आहे. त्याची सध्याची सर्वोत्तम कामगिरी हि ८६.०५m एवढी आहे.

९) विटेझस्लाव्ह वेस्ली- विटेझस्लाव्ह वेस्ली हे सर्वात वयस्कर खेळाडू आहे. या ३८ वर्षीय खेळाडूने त्याच्या काळात ऑलिम्पिक मध्ये २ कांस्य जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक आणि युरोपिअन चॅम्पिअनशिप मध्ये सुवर्णपदक आणि त्याच स्पर्धेत दोन रौप्य पदक जिंकले आहेत. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी हि ८८.३४ एवढी आहे.

१०) केशार्न वॉलकॉट- केशार्न वॉलकॉट या २८ वर्षीय खेळाडूने पॅन अमेरिकन गेम्स मध्ये एक रौप्य आणि सुवर्णपदक तसेच ऑलिम्पिक मध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. आणि त्याचा वैयक्तिक सर्वोत्कृष्ट ९०.१६m आहे.

Leave a Comment