ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग या खेळाबद्दल माहिती:- Information of Olympic Weight Lifting in Marathi

Information of Olympic Weight Lifting in Marathi:- वेटलिफ्टिंग हा एक ऑलिम्पिक मध्ये खेळला जाणारा खेळ आहे. हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये एक खेळाडू स्टीलच्या बारला जोडलेली जड वजनाचे प्लेट्स उचलतात. याला बारबेल असे म्हणतात. म्हणजेच ज्यामध्ये खेळाडू जमिनीपासून ओव्हरहेड पर्यंत वजनाच्या प्लेट्सने भरलेली बारबेल उचलण्याची स्पर्धा करतात.आणि जो खेळाडू सर्वात जास्त वजन उचलतो तोच विजेता म्हणून घोषित केला जातो.

ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग या खेळाबद्दल माहिती

ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग या खेळाबद्दल माहिती:- Information of Olympic Weight Lifting in Marathi

हा एक पॉवर गेम आहे. जा खेळ खेळासाठी मजबूत शरीर,कौशल्य आणि खूप ताकद लागते.

वेटलिफ्टिंगला दोन स्पर्धांमध्ये विभागले आहे, एक म्हणजे स्नॅच आणि दुसरी म्हणजे क्लीन अँड जर्क.

स्नॅच हि वेटलिफ्टिंगची पहिली फेरी असते. हि फेरी खूप महत्वाची आहे या फेरीत खेळाडूला एका फटक्यात वजन उचलावे लागते. यादरम्यान, खेळाडूला शरीराचा कोणताही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते. यामध्ये खेळाडूला एकावेळी वजन डोक्यावरून हलवावे लागते. यामध्ये प्रत्येक खेळाडूला तीन संधी दिल्या जातात. जो सर्वोत्तम गन मिळवतो त्याला अंतिम फेरीत स्थान दिले जाते.

क्लीन अँड जर्क हि दुसरी फेरी आहे. पहिल्या फेरीप्रमाणे या फेरीमध्ये सुद्धा खेळाडूला तीन संधी दिल्या जातात. यात प्रथम वजन खांद्यापर्यंत न्यावे लागते. या दरम्यान खेळाडूचे पाय वाकलेले नसावे. आणि दुसऱ्या वेळेला वजन चढवावे लागते पण रेफरी सिग्नल देत नाही तेव्हापर्यंत वजन हे वर ठेवावे लागते आणि तिसऱ्या वेळेला असेच घडते. स्नॅच मध्ये पात्र ठरलेल्यांनाच क्लीन अँड जर्क मध्ये संधी मिळते.

वेटलिफ्टिंग स्पर्धा, हि आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन(IFW) द्वारे आयोजित केली जाते. यात प्रत्येक देशाला दहा पुरुष आणि नऊ महिला खेळाडूंचा संघ ठेवण्याची परवानगी आहे, परंतु आठ पुरुष आणि सात महिला खेळाडूंनाच भाग घेण्याची परवानगी आहे. खरं तर, प्रत्येक श्रेणीमध्ये फक्त एकच सहभागींना परवानगी आहे. ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी सात वर्गांमध्ये विभागले गेले आहेत. पुरुषाच्या वेटलिफ्टिंगचे वर्गीकरण हे, ६१ किलो,६७ किलो, ७३ किलो, ८१ किलो, ९६ किलो, १०९ किलो,आणि १०९ किलो पेक्षा जास्त असे करण्यात आहेत.

आणि महिलांच्या वेटलिफ्टिंगचे वर्गीकरण हे ४९ किलो, ५५ किलो, ५९ किलो, ६४ किलो, ७६ किलो, ८७ किलो, आणि ८७ किलो पेक्षा जास्त असे करण्यात आले आहे. वेटलिफ्टिंग खेळाचा उपयोग हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो.

ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगचा इतिहास:-

वेटलिफ्टिंगची सुरुवात २००० वर्षांपूर्वी प्राचीन चिनी आणि ग्रीक संस्कृतीपासून झाली. म्हणूनच वेटलिफ्टिंग या खेळाचे मूळ प्राचीन इजिप्शियन आणि ग्रीक समाजात आहे. १८९६ अथेन्स च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये ट्रॅक आणि फिल्डचा एक भाग म्हणुन वेटलिफ्टिंग प्रथम ऑलिम्पिक मध्ये सादर करण्यात आले. आणि १९१४ मध्ये अधिकृतपणे त्याची स्वतःची स्पर्धा म्हणून म्हणून ओळखली गेली. आणि तेव्हपासून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्याची ओळख झाली आहे. तेव्हापासून त्याची लोकप्रियता अनेक पटीने वाढली आहे.

आधुनिक वेटलिफ्टिंग स्पर्धेचा उगम १८ व्या आणि १९ व्या शतकातील बलवान पुरुषांमध्ये सापडला आहे, जसे कि जर्मनीचे यूजीन सॅंडो आणि आर्थर सॅक्सन, रशियाचे जॉर्ज हॅकेनश्मिट आणि फ्रान्सचे लुई अपोलॉन ज्यांनी सर्कस आणि थिएटर मध्ये कामगिरी केली. तेव्हापासून वेटलिफ्टिंग बद्दल लोकांना माहिती झाली. आणि आज वेटलिफ्टिंग बद्दल लोकांमध्ये खूप जास्त क्रेज वाढली आहे.

ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग चे नियम:-

ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये वापरलेले नियम हे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) द्वारे निर्धारित केलेले असते. आणि ऑलिम्पिक प्रशासनाद्वारे मंजूर केलेले मानक आंतरराष्ट्रीय नियम आहेत. वेटलिफ्टिंगचे तीन नियम आहेत. आणि ते खालीलप्रमाणे आहेत.

१) वजन वर्ग नियम:-

या खेळातील खेळाडू अनेक वजन वर्गात विभागले जातात. प्रत्येक देशात प्रत्येक वजन वर्गात फक्त दोन लिफ्टर्सना स्पर्धा करण्याची परवानगी आहे. जर वजन वर्गासाठी नोंदीची संख्या खूप मोठी असेल,जसे कि १५ पेक्षा जास्त नोंदी असतील, तर ती दोन गटांमध्ये विभागली जाऊ शकते. एका गटामध्ये सर्वात बलवान खेळाडू असतील. जेव्हा सर्व गटाचे अंतिम परिणाम एकत्रित केले जातात आणि रँक केले जातात. सर्वात जास्त साकोरे हा सुवर्ण जिंकतो, आणि त्यांनतर रौप्य जिंकतो, आणि तिसऱ्या क्रमांक कांस्य जिंकतो.

२) वेटलिफ्टिंग उपकरणांचे नियम:-

पुरुष आणि महिला वेगवेगळे लोह वापरतात.पुरुष २० किलो वजनाचा बारबेल वापरतो आणि महिला १५ किलो वजनाचा बारबेल वापरतात. प्रत्येक बार हा २.५ किलो वजनाच्या दोन कॉलरसह सुसज्ज असणे आवश्यक आहे. बारबेल सर्वात कमी वजनापासून ते सर्वात जास्त वजनापर्यंत लोड केले जातात. खेळाडूने वजन घोषित केल्यांनतर लिफ्ट केल्यांनतर बारबेलचे वजन केले जात नाही. व्यासपीठावर बोलावल्यानंतर प्रयत्न करण्यासाठी खेळाडूची मर्यादा एक मिनिट आहे, ३० सेकंड शिल्लक असताना चेतावणी सिग्नल वाजतो. या नियमाला अपवाद म्हणजे जेव्हा एक स्पर्धक दुसर्यांनंतर दोन प्रयत्न करतो. या प्रकरणात, खेळाडू दोन मिनिटे विश्रांती घेऊ शकतो आणि ९० सेकंड लिफ्टशिवाय निघून गेल्यानंतर त्याला चेतावणी मिळेल.

३) निर्णय नियम:-

प्रत्येक खेळाडूला प्रत्येक लिफ्टसाठी प्रत्येक निवडलेल्या वजनावर तीन प्रयत्न करण्याची परवानगी आहे. तीन रेफरी लिफ्टचा न्याय करतात. लिफ्ट यशस्वी झाल्यास रेफरी ताबडतोब पांढरी बटण मारतो. आणि पांढरा प्रकाश चालू केला जातो. त्यांनतर गन नोंदवले जातात. लिफ्ट अयशस्वी झाल्यास, रेफरी लाल बटण मारतो आणि लाल दिवा निघून जातो. प्रत्येक लिफ्टसाठी सर्वोच्च स्कोर हा लिफ्टचे अधिकृत मूल्य म्हणून वापरला जातो.

वेटलिफ्टिंग खेळासाठी लागणारे उपकरणे:-

१) बारबेल:– बारबेल हा एक स्टीलचा रॉड आहे ज्यात स्टील डिस्क चे वजन दोन्ही बाजूंना जोडलेले असते. आणि जोडलेले वजन हे २५, २०, १५, १०, ५, २.५ आणि १.२५ किलो वजनाचे असते. पुरुषांसाठी बारबेलची लांबी हि २.२ मीटर म्हणजेच ७.२ फूट असते. व वजन २० किलो असते. आणि महिलांसाठी बारबेलची लांबी हि २.०१ मीटर म्हणजेच ६.६ फूट असते. व वजन १५ किलो असते.

२) बंपर प्लेट्स:- बंपर प्लेट्स हे वेगवेगळे असते. आणि ते रंगानुसार विभागले असते.

  • लाल – २५ किलो
  • निळा – २० किलो
  • पिवळा – १५ किलो
  • हिरवा – १० किलो
  • पांढरा – ५ किलो
  • लाल – २.५ किलो
  • निळा – २ किलो
  • पिवळा – १.५ किलो
  • हिरवा – १ किलो
  • पांढरा – ०.५ किलो

३) कॉलर:- वजनाच्या प्लेट्स प्रत्येक स्लीव्ह वर कॉलर वापरून बारबेल वर सुरक्षित केल्या जातात.

४) पट्टा:– वेटलिफ्टिंग बेल्ट हे ओटीपोटात दाब वाढवण्यासाठी वापरला जातो आणि हा बेल्ट १२० मिमी रुंदीचा असतो.

५) खडू:– लिफ्टच्या प्रत्येक प्रयत्नापुर्वी कोरडेपणा वाढवण्यासाठी आणि खेळाडूंच्या हातात बार फिरू नये म्हणून लिफ्टर त्यांचे हात खडूने घासतात.

६) टेप:- ऑलिम्पिक लिफ्टरच्या अंगठ्यावर टेप आढळून येतो. टेप केलेला अंगठा हुक ग्रिप संबंधित वेदना कमी करण्यास मदत करतो. तसेच लिफ्ट पूर्ण करताना त्यांच्या शरीराच्या घर्षणाच्या संपर्कात असलेल्या भागांना झाकण्यास टेपचा वापर केला जातो.

७) शूज:- शूज चे तळवे बरेच कठोर असतात, जे जास्त भाराखाली असताना कॉम्प्रेशनचा प्रतिकार करण्यास मदत करते. शूज जास्तीत जास्त स्थिरतेसाठी डिजाइन केले आहे.

८) सिंगल:- लिफ्टर्स वनपीस परिधान करत असतात. आणि ते क्लोज फिटिंग असतात ज्याला सिंगल असे म्हणतात.

Leave a Comment