कलारीपयट्टू खेळाविषयी माहिती:- Kalaripayattu Game Information In Marathi:-

कलारीपयट्टू खेळाविषयी माहिती:- Kalaripayattu Game Information In Marathi:- आपण भरपूर खेळांची नावे ऐकली आहेत आणि आपण भरपूर खेळ खेळलो आहेत. अश्याच भरपूर खेळांपैकी एका खेळाची माहिती आपण जाणून घेऊया. आज आपण कलारीपयट्टू या खेळाबाबद्दल माहिती जाणून घेऊया.

कलारीपयट्टू खेळाविषयी माहिती:- Kalaripayattu Game Information:-

कलारीपयट्टू खेळाविषयी माहिती:- Kalaripayattu Game Information In Marathi:-

कलारीपयट्टू या खेळाबद्दल आपण फार काही ऐकले नाहीत. प्राचीन काळी सत्तेसाठी खूप मोठमोठी युद्ध व्हायची आणि त्यात वेगवेगळ्या खेळांचा वापर केला जात असे जसे कि, तलवारबाजी, धनुष्यबाण आणि इतर काही वेगवेगळे मार्शल आर्टस् इ. कलारीपयट्टू हि एक प्राचीन काळी युद्धात वापरली जाणारी एक सर्वात जुनी मार्शल आर्टस् आहे.

कलारीपयट्टू हि एक सर्वात जुनी आणि वैज्ञानिक मार्शल आर्ट आहे. कलारीपयट्टू चा वापर पूर्वीच्या काळी युद्धात केला जात असे. कलारीपयट्टू ची सुरुवात हि भारतातील केरळ राज्यात झाली.

कलारीपयट्टू या खेळाला केरळची शान म्हणून देखील ओळखले जाते. कलारीपयट्टूचे चाहते अनेक देशांमध्ये आहे. कलारीपयट्टू मध्ये बॉलीवूड अभिनेता विद्युत जमवाला देखील अतिशय पारंगत आहे. या खेळात दोन खेळाडू एकत्रित पणे स्वतःची कलाबाजी दाखवतात.

कलारीपयट्टू हा खेळ महिला आणि पुरुष असे दोन्ही गट खेळू शकतात. यामध्ये अनेक तंत्रे आहेत, ज्यामध्ये मपायट्टू (शारीरिक शारीरिक व्यायाम), वाडिपायट्टू (लाकडाशी लढणे), वेरुकाईपयोग (हाताचा व्यायाम) इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये ८ ते १६ प्रकारची झुंज दिली जाते आणि पहिल्या शारीरिक व्यायामानंतर पुढील लढाई केली जाते.

कलारी म्हणजे काय? What is Mean by Kalari?

कलारी म्हणजे शाळा आणि पायट्टू म्हणजे प्रशिक्षण. मुठीच्या फटीपासून तर तलवारीच्या झुलापर्यंतची जाणीवपूर्वक केलेली हालचाल म्हणजे हि ध्यान क्रिया आहे. हि ध्यान क्रिया केरळचे योद्धे युद्धात वापरत असे.

प्राचीन काळी कलारीपयट्टू चे अनेक प्रकार विकसित होते, परंतु आता कलारीपयट्टू चे केवळ दोनच प्रकार लोकप्रिय राहिलेले आहेत ते म्हणजे सेरू( पारंपरिक औषधाच्या उद्देशाने वापरलेले) आणि दुसरे म्हणजे कुझी ( प्रशिक्षण ठिकाण).

कलारीपयट्टू या खेळाचा इतिहास:- History of Kalaripayattu:-

कलारीपयट्टू हि प्राचीन काळी युद्धात वापरली जाणारी प्रसिद्ध मार्शल आर्टस् आहे. कलारीपयट्टू जवळपास २००० वर्षांपूर्वी वापरली जाणारी मार्शल आर्ट आहे. जी स्वतःच्या रक्षणासाठी वापरली जात होती.

कलारीपयट्टू या खेळाच्या हालचाली या सिंह, वाघ आणि अन्य जंगली प्राण्यांच्या कच्चा शक्ती, भव्य शक्ती आणि उपजत तंत्र लढण्याच्या तंत्रापासून प्रेरित होऊन रचलेल्या आहेत.

अनेक इतिहासकारांच्या मते, सर्व मार्शल आर्टस् ची जननी म्हणून कलारीपयट्टू ला ओळखले जाते. ११-१६ व्या शतकाच्या दरम्यान कलारीपयट्टू हा खेळ केरळ मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध होता आणि केरळ समाजाचा अविभाज्य घटक होता.

केरळमध्ये ७ वर्षापेक्षा मोठ्या मुलांना कलारीपयट्टूचे प्रशिक्षण दिले जात असे. हजारो वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खू असलेल्या बौद्ध धर्माने कलारीपयट्टू हि कला भारतात आत्मसात केली. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी ते चीनमध्ये गेले तेव्हा त्यांनी चिनी लोकांना लढण्याची हि कला आणली.

कलारीपयट्टू मध्ये सर्व प्रथम उडी मारणे, झेप घेणे, धावणे यासारख्या कला आधी शिकवल्या जात असे. त्यानंतर लाकडापासून बनवलेल्या शस्त्रांनी खेळायला शिकवल्या जात असे. यांनतर पुन्हा धातूची शस्त्रे वापरायला शिकवण्यात आली.

शेवटी त्यांना हाताने स्वतःचा बचाव करायला शिकवले. कलारीपयट्टू या कलेत प्रभुत्त्व मिळविण्यासाठी जवळपास सात वर्षे लागतात.

कलारीपयट्टू या खेळाचे फायदे:- Benefits of Kalaripayattu:-

कलारीपयट्टू हा खेळ खेळल्याने बुद्धी तल्लख होते. कलारीपयट्टू हा खेळ खेळल्याने तुम्ही तज्ञ तर होताच त्याबरोबर चपळाई सुद्धा वाढते. कलारीपयट्टू मध्ये तुम्हाला बचावात्मक आणि आक्रमक अशी दोन्ही तत्वे शिकवली जातात.

कलारीपयट्टू मुळे तुमची बुद्धिमत्ता देखील वाढते. कलारीपयट्टू या खेळामुळे आपले शरीर मजबूत आणि तंदरुस्त होण्यास मदत होते.

कलारीपयट्टू मध्ये प्रतिस्पर्ध्यावर अतिशय वेगाने हल्ला करावा लागतो त्यामुळे आपली चपळता सुद्धा वाढण्यास मदत होते. तसेच इतर काही मार्शल आर्टस् मुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढते तशीच कलारीपयट्टू मुळे देखील शरीराची लवचिकता वाढते.

कलारीपयट्टू चे काही मूलभूत तंत्र:- Some Basic Techniques of Kalaripayattu:-

कलारीपयट्टू चे काही मूलभूत तंत्र आपण जाणून घेऊया-

सहा मूलभूत किक-

नेर्कल – सरळ गुडघा आणि पायाची बोटे वाढवून डोक्याच्या वरती किक दिली जाते.

वितुकल – प्रदक्षिणा मारणारी,म्हणजेच बाहेरून आत किक मारणे. ताणलेला पाय शरीरासमोर प्रदक्षिणा घातला जातो, पाय डोक्याच्या वर पोहोचतो.

अकमकल – प्रदक्षिणा मारणे, म्हणजेच आतून बाहेर किक मारणे. ताणलेला पाय शरीरासमोर प्रदक्षिणा घालतो, पाय डोक्याच्या वर पोहोचतो.

कोंकल – नेर्कल सारखीच, पण उजवी किक आता डाव्या खांद्याकडे जाते आणि डावा पाय उजव्या खांद्यावर.

तिरिकुकल – एकाच पायाने फेकलेल्या तीन सरळ किक, दुसऱ्या पायावर दोन वेळा १८० अंशांवर फिरवताना.

इरुत्तिकल – सरळ लाथ मारल्यानंतर, लाथ मारणारा पाय शरीराच्या मागे थोडासा स्वीप करतो. त्या क्षणी प्रॅक्टिशनर शरीराचे वजन मागील पायावर हलवतो आणि त्या पायावर खाली बसतो, तर निष्क्रिय पाय पुढे ठेवला जातो.

Leave a Comment