लंगडी या खेळाविषयी माहिती:- Langadi Game Information In Marathi:-

लंगडी या खेळाविषयी माहिती:- Langadi Game Information In Marathi:- लंगडी हा भारताच्या ग्रामीण भागातील खूप प्रसिद्ध असा खेळ आहे. लंगडी हा खेळ विशेषतः मुली आणि महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. लंगडी हा खेळ भारतात प्राचीन काळापासून खेळल्या जातो. ग्रामीण भागात आजही लंगडी या खेळला खूप महत्व आहे.

लंगडी या खेळाविषयी माहिती:- Langadi Game Information:-

 Langadi Game Information

आजही ग्रामीण भागातील मुली लंगडी हा खेळ आवडीने खेळतात. लंगडी हा खूप मजेशीर आणि आनंददायी असा खेळ आहे. लंगडी या खेळाने शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. लंगडी हा खेळ भारताच्या विविध ठिकाणी खेळल्या जातो त्यामुळे लंगडीला भारतात वेगवेगळी नावे आहेत.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांत लंगडीला कुकुराझू, अरोनी किंवा पंजाबमध्ये गामोसा, दिल्लीत लंगाडा शेर म्हणून दक्षिणेत लंगडी टांग तर ओरिसा सारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये चुटा गुडू म्हणून देखील ओळखले जाते. पूर्वी लंगडी हा खेळ शाळेत सुद्धा खेळल्या जात होता.

तोल, चपळता, दमदारपणा आणि शारीरिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी पूर्वी हा खेळ शाळेत सुद्धा खेळल्या जात होता. लंगडी हा एक मैदानी खेळ आहे. ६-७ खेळाडू लंगडी हा खेळ खेळू शकतात, त्याहून अधिक खेळाडू सुद्धा लंगडी हा खेळ खेळू शकतात.

लंगडी खेळाचा इतिहास:- History of Langadi:-

लंगडी हा खेळ प्राचीन काळापासून भारतात खेळल्या जात आहे. परंतु दुर्दैवाने लंगडी हा खेळ म्हणून विकसित करण्याचा विचार कोणी केला नाही. २००९ मध्ये लंगडी फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण भारतात हा खेळ लंगडी म्हणून ओळखला जातो.

लंगडी फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिव सुरेश गांधी यांनी २००९ मध्ये लंगडी या खेळाचा सखोल अभ्यास करून एकतर्फी आणि सामान्य नियम बनवण्यास सुरुवात केली.

लंगडीला संघटनात्मक संरचना मिळवून देणे हा यामागील मुख्य हेतू होता ज्यामुळे लोकप्रियता, नियमांमध्ये एकरूपता आणि विकास होण्यास मदत होईल.

२००९ मध्ये लंगडी या खेळाची उत्पत्ती झाल्यानंतर, लंगडीने पोखरा, नेपाळ येथे २०१३ मध्ये नेपाळ आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय स्पर्धेसाठी आणि आता २०१४ मध्ये फंटशोलिंग, भुतान, भूतान येथे पहिली त्रिकोणी स्पर्धा आयोजित करून आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला.

तसेच २०१५ मध्ये बँकॉक, थायलंड येथे पहिल्या आशियाई खेळांचे यशस्वी आयोजन केले होते. २०१७ मध्ये देखील सिंगापूरमध्ये दुसरे आशियाई खेळ आयोजित करण्यात आले होते. आणि या स्पर्धेत भारत, सिंगापूर, बांगलादेश आणि नेपाळ या संघांनी सहभाग घेतला होता.

लंगडी हा खेळ कसा खेळल्या जातो? How to Play Langadi?

लंगडी हा एक मैदानी खेळ आहे. लंगडी हा खेळ सर्वसाधारणतः मुली खेळतात. लंगडी हा खेळायला एका छोट्या मैदानाची गरज असते. साधारणतः १४-१६ मीटर चे एक मैदान असायला हवे.

लंगडी खेळायला जवळपास ७-८ खेळाडूंची आवश्यकता असते. किंवा त्याहून अधिक खेळाडू देखील लंगडी हा खेळ खेळू शकतात. लंगडी खेळात एक खेळाडूवर डाव असतो आणि बाकी खेळाडू हे मैदानावर पळत असतात.

लंगडी खेळत असताना डाव असणाऱ्या खेळाडूला लंगडी घातलेला पाय जमिनीवर पाय ठेवायची आणि हात सुद्धा जमिनीवर स्पर्श करण्याची परवानगी नसते. जर डाव देणाऱ्या खेळाडूने आपला हात किंवा पाय जमिनीला स्पर्श केल्यास तर तो बाद होतो आणि परत त्याच खेळाडूला डाव द्यावा लागतो आणि परत नव्याने खेळाची सुरुवात करावी लागते.

लंगडी या खेळात डाव देणाऱ्या खेळाडूला मैदानात पळत असलेल्या बाकी खेळाडूंना हाताने स्पर्श करून बाद करावे लागते. आणि पळणाऱ्या खेळाडूंना डाव देणाऱ्या खेळाडूला चुकवून पळावे लागते. जर डाव देणाऱ्या खेळाडूने आपला हात किंवा पाय जमिनीला स्पर्श केल्यास तर तो बाद होतो आणि परत त्याच खेळाडूला डाव द्यावा लागतो.

लंगडी या खेळाचे नियम:- Rules of Langadi:-

लंगडी हा खेळ शारीरिक बळकटता आणि शारीरिक चपळता वाढवण्यासाठी खेळला जातो. लंगडी या खेळाचे काही सामान्य नियम आहेत. ते नियम आपण खालीलप्रमाणे बघू-

  • लंगडी या खेळाचा कालावधी साधारणतः २० मिनिटे असतो आणि यात ५-५ मिनिटाचे दोन डाव असतात.
  • लंगडी या खेळात ६-७ खेळाडूंची आवश्यकता असते आणि यात एका खेळाडूने डाव घेणे आवश्यक असते.
  • डाव देणाऱ्या खेळाडूला पळणाऱ्या खेळाडूंना स्पर्श करून बाद करायचे असते यासाठी खेळाडूला १ गुण मिळतो.
  • डाव देणाऱ्या खेळाडूने जर जमिनीला हाताने स्पर्श केल्यास किंवा लंगडी घेतलेला पाय जमिनीवर टेकवला तर तो खेळाडू बाद होतो आणि परत नवीन खेळ चालू करावा लागतो.
  • तसेच पळणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला तर तो बाद होतो.
  • लंगडी घेतलेल्या खेळाडूने पळणाऱ्या सर्व खेळाडूंना बाद केले तरच तो खेळाडू डाव देण्यापासून मुक्त होतो.

Leave a Comment