नेटबॉल खेळाविषयी माहिती:- Netball Game Information In Marathi:-

नेटबॉल खेळाविषयी माहिती:- Netball Game Information In Marathi:- बॉल संबंधित आपण अनेक खेळांची माहिती बघितली आहे. आज आपण पुन्हा, अश्याच एका खेळाविषयी जाणून घेऊ. आज आपण नेटबॉल या खेळाबद्दल माहिती जाणून घेऊ. नेटबॉल हा एक मैदानी खेळ आहे.

नेटबॉल खेळाविषयी माहिती:- Netball Game Information:-

Netball Game Information

नेटबॉल हा खेळ दोन संघांमध्ये खेळल्या जातो. नेटबॉल हा खेळ ७ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळल्या जातो. नेटबॉल हा बास्केटबॉल या खेळासारखाच खेळ आहे. नियम आणि संघ संख्या वेगळी असली तरीही नेटबॉल हा बास्केटबॉल सारखाच खेळ आहे.

नेटबॉल हा खेळ जास्त प्रमाणात महिला आणि मुली खेळतात. अमेरिकेतील बास्केटबॉल या खेळातून नेटबॉल या खेळाची उत्पत्ती झाली. नेटबॉल हा एक वेगवान आणि उत्साही खेळ आहे ज्यामध्ये धावणे, उडी मारणे, पकडणे आणि फेकणे यासारख्या शारीरिक हालचालींचा समावेश होतो.

नेटबॉलचा या खेळाचा मुख्य उद्देश हा खेळ जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या संघापेक्षा बास्केटद्वारे जास्त गुण मिळवणे हा आहे.

नेटबॉल चा इतिहास:- History of Netball:-

नेटबॉल हा बास्केटबॉल सारखाच खेळ आहे. नेटबॉलची उत्पत्ती अमेरिकेच्या बास्केटबॉल मधून झाली. बास्केटबॉलचा परिचय झाल्यांनतर १८९०च्या दशकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये त्याचा विकास झाला.

१८९१ मध्ये बास्केटबॉलची निर्मिती झाल्यानंतर एक वर्षानंतर, महिलांच्या खेळातील गुंतवणुकीच्या संदर्भात सामाजिक नियमांना लक्षात घेऊन या खेळात बदल करण्यात आले, ज्यामुळे महिलांच्या बास्केटबॉलच्या शोधाचा मार्ग उपलब्ध झाला.

नेटबॉलच्या नियमांचा पहिला संच विसाव्या शतकाच्या सुरूवातीस लिहिला गेला आणि तेव्हापासून हा नवीन खेळ संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यात पसरला. सुरुवातीच्या काळात नेटबॉल हा महिलांसाठी उपयुक्त असा खेळ म्हणून मोठ्या प्रमाणावर मान्य केला जात होता.

विसाव्या शतकाच्या प्राथमिक भागामध्ये स्थानिक नेटबॉल स्पर्धा काही राष्ट्रांमध्ये उदयास आल्या. १९६० पर्यंत, नेटबॉलची तत्त्वे आणि नियम सार्वत्रिकरित्या संस्थात्मक केले गेले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नेटबॉल हा खेळ विस्तारत गेला.

नेटबॉल खेळाच्या जागतिक स्पर्धा आणि INF नेटबॉल विश्वचषक १९६३ पासून सुरु झाले. १९९८ पासून नेटबॉल हा खेळ कॉमनवेल्थ गेम्स मध्ये देखील खेळला जात आहे. भारतात नेटबॉल हा खेळ १९२६ पासून खेळायला सुरुवात झाली.

नेटबॉल खेळाचे मैदान:- Playing Area of Netball:-

Playing Area of Netball
नेटबॉल खेळाचे मैदान

नेटबॉल हा एक मैदानी खेळ आहे. नेटबॉल खेळाचे कोर्ट हे बसस्केटबॉल कोर्ट पेक्षा थोडे मोठे असते. नेटबॉल कोर्ट हे साधारणतः १०० फूट लांब आणि ५० फूट रुंद असते.

लांब बाजूंना साइड लाईन्स म्हणून ओळखले जाते तर लहान रेषांना गोल लाईन्स किंवा बॅक लाईन्स असे म्हटले जाते. या दोन रेषा कोर्टला तीन भागात विभाजतात, आणि त्यांना ट्रांसवर्स लाईन्स असे म्हणतात.

कोर्टच्या मध्यभागी ९ मी व्यासाचे एक वर्तुळ आहे. तसेच कोर्टच्या दोन्ही टोकाला ४. ९ मी त्रिज्याचे दोन अर्धवर्तुळ आहे ज्याला शूटिंग सर्कल किंवा गोल सर्कल असे म्हणतात. गोलपोस्ट रिंगच्या शिर्षस्थानापासून जमिनीपर्यंत १० फूट उंच आहे. नेटबॉल मध्ये बॅकबोर्ड नसतो.

नेटबॉल कसा खेळल्या जातो? How to Play Netball?

नेटबॉल खेळाची सुरुवात टॉस जिंकून केली जाते. टॉस ठरवते कि कोणता संघ खेळाची सुरुवात करेल. यानंतर एम्पायरच्या व्हिसलच्या तीन सेकंदामध्ये खेळाची सुरुवात होते.

खेळ सुरु होताच खेळाडूंना त्यांच्या स्थितीनुसार कोर्टमधे पसरावे लागते, आणि एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूकडे चेंडू फेकण्याची क्रिया सुरु होते. अश्यातच विरोधी संघाचे खेळाडू कोर्टात चेंडू रिंग मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात.

आणि दुसरा संघ त्यांच्या प्रयत्नांना विरोध करतो, जेणेकरून गोल रोखता येईल. यासाठी गोलकिपर महत्वाची भूमिका निभावतो. शेवटी जो संघ जास्त गोल करणार तो संघ विजेता घोषित केला जाईल.

नेटबॉल या खेळाचे नियम:- Rules of Netball:-

नेटबॉल या खेळाचे नियम खालीलप्रमाणे आहेत-

  • नेटबॉलच्या एका सामन्यात १५ मिनिटांचे चार क्वार्टर असतात.
  • पहिल्या आणि दुसऱ्या तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टर मध्ये ४ मिनिटांचा गॅप असतो.
  • नेटबॉल हा खेळ दोन संघांमध्ये खेळल्या जातो. एका संघात प्रत्येकी ७ खेळाडू असणे आवश्यक आहे.
  • नेटबॉल कोर्ट हा तीन भागांमध्ये विभागल्या जातो. आणि प्रत्येक खेळाडूने कोर्टवर आपले विशिष्ट स्थान धारण करणे गरजेचे आहे.
  • एक खेळाडू ३ सेकंदाच्या वर जास्त वेळ बॉल पकडू शकत नाहीत.
  • गोल करण्यासाठी बॉल रिंग हुप्स मधून टाकणे आवश्यक आहे.
  • चेंडू ताब्यात असताना खेळाडू १.५ पेक्षा पाऊले टाकू शकत नाही.

नेटबॉल खेळासाठी लागणारे उपकरणे:- Equipment for Netball:-

 Equipment for Netball
नेटबॉल खेळासाठी लागणारे उपकरणे

नेटबॉल हा खेळ खेळायला जास्त उपकरणांची गरज नाही. नेटबॉल खेळायला लागणाऱ्या उपकरणांची यादी खालीलप्रमाणे आहेत-

१) बॉल:- नेटबॉल खेळायला लागणारा बॉल हा रबर किंवा चामड्याचा बनलेला असतो. या बॉलचा घेर हा ६९-७१ सेमी असतो. आणि वजन जवळपास हे ४००- ४५० ग्राम असतो.

२) शूज:- आरामदायी, हलके शूज खेळाडूंनी परिधान केले आहेत ज्यांच्या तळव्यांना चांगली पकड आहे. आणि धावण्यास मदत देखील होते.

३) गोल-पोस्ट:- प्रत्येक गोल रेषेच्या मध्यभागी स्थित उभ्या गोल पोस्टमध्ये एक धातूची रिंग असते ज्यामधून नेट लटकते. नेटबॉल गोलपोस्टला बॅकबोर्ड नसतो.

४) नेटबॉल कपडे:- नेटबॉल खेळायला खेळाडू हलके आणि श्वास घेण्यासाठी योग्य असे कपडे परिधान करतात.

Leave a Comment