शूटिंग/ नेमबाजी बद्दल माहिती:- Shooting Information In Marathi:-

शूटिंग/ नेमबाजी बद्दल माहिती:- Shooting Information In Marathi:- शूटिंग हा खेळ जगभरात खूप लोकप्रिय आहे. शूटिंग ला मराठीमध्ये नेमबाजी असे म्हणतात. नेमबाजी हा खेळ खूप प्राचीन काळापासून जगभर खेळला जातो. आणि जगभरात नेमबाजी चे खूप चाहते आहेत. लहानांपासून तर तरुण आणि म्हाताऱ्यांपर्यंत नेमबाजी या खेळाला पसंद करतात.

शूटिंग/ नेमबाजी बद्दल माहिती:- Shooting Information:-

शूटिंग/ नेमबाजी बद्दल माहिती:- Shooting Information In Marathi:-

नेमबाजी हा एक ऑलिम्पिक खेळ आहे. नेमबाजी या खेळासाठी मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही कौशल्ये असणे आवश्यक आहे.

नेमबाजी म्हणजे रायफल, हँडगन (पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर) आणि निशानेबाजीचा सराव म्हणून शॉटगनसह विविध प्रकारच्या लक्ष्यांवर गोळीबार करण्याचा खेळ आहे. शूटिंग किंवा नेमबाजी हा खेळ काळानुसा प्रगती करत आहे.

हा खेळ मुलांसाठी अतिशय रोमांचक आहे. मात्र, नेमबाजी क्लब आणि क्रीडाविषयक प्रशिक्षण घेण्यासाठी अधिक पैसे लागतात. पण जर तुम्ही या खेळातील तुमचे कौशल्य वाढवले तर त्यामुळे ते तुमच्या भविष्यासाठी एक चांगला मार्ग तयार करू शकता.

आणि या खेळाच्या लोकप्रियतेमुळे नेमबाजी हा खेळ आज विविध स्तरावर खेळल्या जातो.

नेमबाजीचा इतिहास:- History of Shooting:-

नेमबाजी या खेळाची सुरुवात १५, १६ व्य शतकात युरोपात झाली असे म्हणतात. विशेषत: मध्य-पश्चिमी राज्यांमध्ये १८५०-१९१७ मध्ये, ऍथलेटिक क्लब आणि शूटिंग क्लबची स्थापना जर्मन वांशिक समुदायाने केली.

रायफलच्या ज्ञानामुळे १८६० च्या दशकात ट्रॅप शूटिंगला खूप प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

पण खराब नेमबाजीमुळे चिंतित होऊन, वैज्ञानिक आधारावर, अमेरिकन अनुभवी अधिकारी कर्नल विल्यम सी. चर्च आणि जनरल जॉर्ज व्हिगंट यांनी नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी १८७१ मध्ये नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ अमेरिका स्थापन केली.

यानंतर, १९०३ मध्ये, NRA काँग्रेसने सर्व प्रमुख महाविद्यालये, विद्यापीठे, लष्करी अकादमींमध्ये रायफल क्लब स्थापन करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये १९०६ मध्ये युवा कार्यक्रम जोरात होता.

राष्ट्रीय सामन्यांमध्ये २०० हून अधिक तरुण मुलांनी भाग घेतला होता. आता आधुनिक काळात द बॉय स्काउट्स ऑफ अमेरिका, ४-एच, एनसीएए, यूएस जेसीजे, द अमेरिकन लीजन आणि बरेच काही यांसारख्या कार्यक्रमांमध्ये दशलक्षाहून अधिक तरुण भाग घेतात.

१८९६ मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये पाच नेमबाजी स्पर्धांचा समावेश करण्याची परवानगी मिळाली. २००४ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये नेमबाजीचे तीन प्रकार दाखविण्यात आले होते – रायफल, पिस्तूल, शॉटगन.

भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनची स्थापना १९५१ मध्ये भारतात नेमबाजी आणि नेमबाजीला चालना देण्यासाठी करण्यात आली.

नेमबाजी चे प्रकार:- Types of Shooting:-

नेमबाजीचे प्रकार हे नेमबाजीसाठी वापरलेली बंदूक, नेमबाजांची स्थिती आणि अंतर यावरून पडलेले आहेत. ऑलिम्पिक मध्ये या खेळाचे पुरुषांसाठी ९ प्रकार आणि महिलांसाठी ६ प्रकार आहेत. नेमबाजीचा प्रकार खालीलप्रमाणे आहेत-

बंदुकीवरून पडलेले नेमबाजीचे प्रकार:-

१) रायफल नेमबाजी ( Rifle Shooting):- रायफल ही सिंगल लोडेड बंदूक आहे. या तोफेची कॅलिबर ५.६ मिमी (बंदुकीच्या बॅरलचा आतील व्यास) आहे आणि रायफलशी संबंधित प्रत्येक इव्हेंट्समध्ये ही बंदूक वापरली जाते.

२) पिस्तूल नेमबाजी (Pistol Shooting):- १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ४.५ मिमी कॅलिबर पिस्तूल बंदूक वापरली जाते आणि २५ मीटर स्पर्धेत ५.६ मिमी कॅलिबर पिस्तूल बंदूक वापरली जाते.

३) शॉटगन शूटिंग (Shotgun Shooting):- या प्रकारच्या नेमबाजीमध्ये नेमबाजलं जे लक्ष्य सध्याचे असते ते हवेमध्ये उडवले जाते आणि नेमबाजाला त्यावर नेम साधून मारावे लागते. या मध्ये दोन प्रकार असतात, ते म्हणजे स्किट आणि ट्रॅप.

शारीरिक स्थितीवरून पडलेले नेमबाजीचे प्रकार:-

१) गुडघे टेकलेल्या स्थितीत (Kneeling Position):- या प्रकारात एकूण ४५ नेम असतात आणि त्यातील १५ नेम हे गुडघे टेकलेल्या स्थितीत असतात. आणि या प्रकारचे नेम हे एकूण ५ मालिकांमध्ये खेळले जातात व ते गुडघे टेकलेले नेम प्रत्येकी २०० सेकंदाच्या अंतराने खेळले जातात.

२) उभे असलेल्या स्थितीत (Standing Position):- या प्रकारात देखील एकूण ४५ नेम असतात आणि त्यातील १५ नेम हे उभ्या स्तिथीत असतात. आणि हे सुद्धा ५ मालिकांमध्ये खेळले जातात आणि ते प्रत्येकी २५० सेकंदाच्या अंतराने खेळले जातात.

३) झोपलेल्या स्थितीत (Prone Position):- यात देखील एकूण ४५ पैकी १५ नेम हे झोपलेल्या स्थितीत खेळले जातात. आणि हे देखील ५ मालिकांमध्ये खेळले जातात आणि ते प्रत्येकी १५० सेकंदाच्या अंतराने खेळले जातात.

नेमबाजीचे नियम:- Rules of Shooting:-

  • नेमबाजी करताना तुम्हाला टार्गेटवर लक्ष केंद्रित गरजेचं आहे.
  • नेमबाजी करत असताना तुमच्या शुटिंग गनमध्ये तुम्हाला योग्य ते बुलेट वापरा लागेल.
  • तुम्ही नेमबाजीत वापरत असलेल्या बंदुकीबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
  • नेमबाजी करताना तुमचे डोळे आणि कान सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक घालण्यास विसरू नका.
  • नेमबाजीदरम्यान ज्या ठिकाणी खेळाडू उभे राहतात आणि लक्ष्य ठेवतात त्या ठिकाणाला नेमबाजीच्या भाषेत स्टेशन असे म्हणतात.
  • शूटिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला रेंज असे नाव देण्यात आले आहे.
  • खेळाडूने नेमबाजी करताना जॅकेटही घालावे. हे जॅकेट खेळाडूला लक्ष्य ठेवताना पकड निर्माण करण्यास मदत करते.

Leave a Comment