स्केटिंग खेळाबद्दल पूर्ण माहिती:- Skating Sport Information In Marathi:-

स्केटिंग खेळाबद्दल पूर्ण माहिती:- Skating Sport Information In Marathi:- आज आपण एक मनोरंजनात्मक खेळ म्हणजेच स्केटिंग बद्दल माहिती जाणून घेऊ. त्यात आपण स्केटिंग म्हणजे काय? स्केटिंगचे प्रकार, स्केटिंगचा इतिहास आणि स्केटिंग साठी लागणारे उपकरणे याबद्दल माहिती जाणून घेऊ.

स्केटिंग खेळाबद्दल पूर्ण माहिती:-Skating Sport Information:-

Skating Information

स्केटिंग हा शरीराची लवचिकता वाढविणारा खेळ आहे. स्केटिंग हा खेळ लहानांपासून तर तरूणांपर्यंत खूप लोकप्रिय असा खेळ आहे. स्केटिंग हा एक आऊटडोअर आहे. स्केटिंग मुळे शरीराची चांगली कसरत होते.

स्केटिंग मुळे शरीराचे स्नायू बळकट होतात. स्केटिंग शरीराच्या प्रत्येक स्नायूंवर कार्य करतात. स्केटिंग हा एक ऑलिम्पिक खेळ आहे. लहान मुलांना लहानपणापासूनच स्केटिंगचे वेड असते. स्केटिंग हा एक करमणुकीचा खेळ आहे तसेच स्पर्धात्मक खेळ आहे.

स्केटिंग म्हणजे एक व्यक्ती चाकांवर बसवलेल्या लहान बोर्डवर समतोल उभी राहून सायकल चालवते. स्केटिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहे, जसे कि, रोलर स्केटिंग, स्पीड स्केटिंग, फिगर स्केटिंग, आइस स्केटिंग आणि आर्टिस्टिक स्केटिंग इ.

स्केटिंग हा खेळ कौशल्यपूर्वक आणि चपळतेने खेळला जातो. स्केटिंग हा खेळ लहान मूळ, तरुण महिला- पुरुष सर्वच लोक करतात.

स्केटिंगचा इतिहास:- History of Skating:-

स्केटिंग चा इतिहास पूर्णपणे ज्ञात नाही. बर्फाच्छादित प्रदेशात प्राचीन काळी लोक बर्फावर इकडून तिकडे घसरत असावे. चौदाव्या आणि पंधराव्या शतकात स्केटिंग हा खेळ लोकप्रिय झाला.

सुरुवातीच्या काळास स्केटिंग हा खेळ बर्फाच्छादित प्रदेशात खेळल्या जात होता आणि थंडीच्या मौसम मध्येच खेळत होता जेणेकरून बर्फ तिथे असावी.

परंतु कालांतराने स्केटिंगसाठी पहिले कृत्रिम बर्फाचे मैदान १८७६ मध्ये लंडन येथे आणि १८७९ मध्ये न्यूयॉर्क मध्ये बनवण्यात आले होते. त्यामुळे उन्हाळ्यातही स्केटिंग करणे सोपे झाले.

१८९२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघाची स्थापना करण्यात आली, आणि त्याच वर्षीपासून आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा सुरु करण्यात आल्या. फिगर स्केटिंग हे १९०८ मध्ये ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतर पुढे १९२४ मध्ये स्पीड स्केटिंग सुद्धा ऑलिम्पिक खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आली.

सुरुवातीच्या काळात फक्त पुरुष सहभाग घेत असत परंतु १९६० पासून महिला सुद्धा स्केटिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागल्या.

स्केटिंग चे प्रकार:- Types of Skating:-

Types of Skating
स्केटिंग चे प्रकार

१) आइस स्केटिंग (Ice Skating) :-

आइस स्केटिंग हा प्रकार बर्फावर खेळला जातो. आइस स्केटिंग हे करमणुकीचे साधन आहे. आइस स्केटिंग हा आऊटडोअर तसेच इनडोअर दोन्ही प्रकारे खेळता येते.

आइस स्केटिंग म्हणजे स्केट्स च्या मदतीने बर्फावर चालणे किंवा धावणे. इनडोअर आइस स्केटिंग हि कृत्रिमरीत्या बनवलेल्या बर्फावर खेळल्या जाते. आआऊटडोअर स्केटिंग हि प्राकृतिक बर्फावर खेळल्या जाते.

आइस स्केटिंग हे स्पर्धात्मक आणि करमणूक म्हणून देखील खेळल्या जातो.

२) फिगर स्केटिंग ( Figure Skating) :-

फिगर स्केटिंग च्या स्पर्धा कृत्रिम बर्फावर घेतल्या जातात. फिगर स्केटिंगचे खेळाडू हे एकल स्केटिंग, दुहेरी स्केटिंग, नृत्य स्केटिंग मध्ये भाग घेऊ शकतात. फिगर स्केटिंग खेळाडू मध्ये संगीताच्या तालावर जोडीने जिम्नॅस्टिक्स ची कौशल्ये दाखवतात.

३) स्पीड स्केटिंग ( Speed Skating) :-

स्पीड स्केटिंग शर्यतीमध्ये सर्वात जास्त वापरली जाते. स्पीड स्केटिंग मध्ये काही खेळाडू ताशी ६० कि.मी वेगाने धावतात. स्पीड स्केटिंग चे लाँग ट्रॅक किंवा ऑलिम्पिक स्केटिंग, शॉर्टकट स्केटिंग, आणि पॅक स्केटिंग असे तीन प्रकार आहेत. यात महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र शर्यती होतात.

४) रोलर स्केटिंग ( Roller Skating) :-

रोलर स्केटिंग मध्ये खेळाडू रोलर घालून स्केटिंग करतात. (रोलर म्हणजे चाक लावून असलेले शूज). काही व्यक्ती रोलर स्केटिंग हि मनोरंजनासाठी केली जाते. काही व्यक्ती डांबरी रस्त्यावर किंवा काँक्रेट रस्त्यावर, बाग यांसारख्या ठिकाणी रोलर स्केटिंग करतात. तर काही जण रोलर स्केटिंग हि संगीताच्या तालावर करतात.

५) आर्टिस्टिक स्केटिंग ( Artistic Skating) :-

आर्टिस्टिक स्केटिंग सुद्धा तालावर केली जाते. आर्टिस्टिक स्केटिंग मध्ये खेळाडू तालावर लयबद्ध होऊन इकडून तिकडे उड्या मारतात आणि उलट सुलट फिरक्या घेतात.

स्केटिंग साठी लागणारे उपकरणे:- Equipment for Skating:-

Equipment for Skating
स्केटिंग साठी लागणारे उपकरणे

स्केटिंग करायला फार काही उपकरणांची आवश्यकता नाही. स्केटिंगच्या वेगवगेळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या उपकरणांची आवश्यकता असते. आपण काही साधारण उपकरणांची यादी बघुयात-

शूज:- स्केटिंग मध्ये वापरले जाणारे शूज हे ग्रॅफाइट आणि केवलर पासून बनवले जातात. स्केट्स बोर्ड वरून पाय घसरू नये म्हणून शूज वापरले जातात.

हेल्मेट:- स्केटिंग करत असताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे. चुकीने पडल्यास डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट घालणे जरुरी आहे.

शिन गार्डस:- शिन गार्डस चा वापर हा चेहऱ्याच्या दुखापतीपासून वाचण्यासाठी केला जातो.

स्किनसूट्स:- खेळाडू स्कीन सूट्स हे शरीराच्या मापाच्या बनवून घेतात, कारण कमी हवेच्या प्रतिकारासाठी लायक्रा स्किन सूट्स हे फायदेशीर असते.

गुडघा पॅड्स:- गुडघा पॅड हे गुडघ्याला लागणाऱ्या दुखापतीपासून रक्षण करते. म्हणूनच खेळाडू स्केटिंग करताना गुडघा पॅड वापरतात.

Leave a Comment